Woman Playing With Python : सापांचं नाव ऐकताच माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत सारेच जण थरथर कापतात. एखादा छोटासा सापही समोर आला की भीतीपोटी माणसाची अवस्था बिकट होते, अशा परिस्थितीत एखाद्या महाकाय अजगराशी आरामात खेळताना दिसले तर थक्क व्हाल. सापाचे हे एक महाकाय रूप आहे, जो त्याच्या विषाने नव्हे तर समोरच्याला गुंडाळून इतक्या वेदनादायक मृत्यू देतो की त्याच्या विचारानेच कुणीही हादरून जाईल.

जगात एकापेक्षा एक साप आहेत, त्यापैकी काही धोकादायक आणि विषारी आहेत, परंतु अजगराचे नाव एक वेगळीच भीती भरून काढण्यासाठी पुरेसे आहे. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आरामात अजगराशी खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. या अजगराचा मूड थोडा जरी बिघडला तरी महिलेचं काही खरं नाही.
या व्हिडीओमध्ये एक महिला एका महाकाय अजगरासह दिसत आहे. अजगर किमान १०-१२ फूट लांब आणि खूप वजनदार दिसतोय. हिरव्या रंगाच्या अजगराला खांद्यावर घेऊन अगदी आरामात फिरताना दिसतेय. या महिलेच्या अंगावर अजगर रेंगाळताना पाहून तुमचा थरकाप उडेल. पण महिला मात्र अजिबात घाबरत नाही. एखाद्या पाळीव अजगरसारखाच हा अजगर महिलच्या अंगावर खेळताना दिसतोय. तरी प्राण्याचा मूड कधी बिघडतो, हे सांगता येत नाही.

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thereptilezoo नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ केवळ काही सेकंदांचा असून तो आतापर्यंत ३ लाख ८४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाईक केले असून, ज्या दिवशी त्याला भूक लागली आणि जेवण मिळणार नाही, तोच त्याचे जेवण बनून जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. काही लोकांनी सापाच्या रंगाची प्रशंसा केली आणि महिलेला लेडी टारझन म्हटलंय.