Shocking Accident Video: सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण आता व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हे कसं झालं या विचारात पडाल.रोहित शेट्टीच्या एखाद्या ऍक्शन मुव्हीसारखा एक सीन चक्क खऱ्या आयुष्यात घडला आहे. एका नाट्यमय प्रसंगात पोलीस एका ट्र्कचा पाठलाग करत असताना तो ट्र्क चक्क पलटतो पण एवढ्यावरच हा व्हिडीओ थांबत नाही.. पुढे असं काही घडतं की ते बघून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो. नेमका हा व्हिडीओ काय आहे हे जाणून घेऊयात..

आपण व्हायरल अपघातांच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, पिकअप ट्रकच्या मागे एक पोलिसांची गाडी पाठलाग करत येत आहे. पलायन करताना ट्र्क रस्त्याचा दुभाजक क्रॉस करून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात दुभाजकाला आदळून ट्रक उलटा पडतो, यावेळी ट्र्कचा वेग इतका अधिक असतो की त्याची काच, व खिडकीचा भाग सुद्धा मोडतो. पण खरा ट्विस्ट पुढे आहे. ही गाडी ज्या वेगाने उलटी पलटते त्याच वेगाने पुन्हा सरळही होते आणि त्यानंतर जणू काहीच झालं नाही अशा पद्धतीने पुन्हा धावू लागते.

अंगावर काटा आणेल हा अपघात

हे ही वाचा<< “बेबी आता….” झोपेत बॉयफ्रेंड समजून बाबांचा कॉल उचलला; Video मध्ये असं काही बोलून गेली की मग..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ @accident_12 या अकाउंटवर शेअर करण्यात आल्यापासून याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी कमेंट करून हा निव्वळ अविश्वसनीय व्हिडीओ असल्याचे म्हंटले आहे. असे स्टंट आपण चुकूनही ट्राय करायला जाऊ नका.