Viral Video: जसा काळ बदलतो तशी माणसे, त्यांचे स्वभाव, गुण, आवडी-निवडीदेखील बदलतात. या सगळ्याचे जिवंत उदाहरण सतत आपल्या डोळ्यांसमोर दिसत असते. सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंग असलेल्या गोष्टींप्रमाणे आपणही वागावं, तसंच काहीतरी करून पाहावं असा हल्लीच्या अनेक मुला-मुलींचा हट्ट असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये स्टंट करताना झालेल्या अपघातांचे व्हिडीओ अनेक जण आवर्जून पाहतात आणि असे स्टंट स्वतः करण्याचं धाडस दाखवतात. बऱ्याचदा हे स्टंट व्यवस्थित केले जातात, तर अनेकदा अशा स्टंटमुळे जीवदेखील जातो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होतच असतं. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. नुकताच असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा चालू कारबरोबर स्टंट करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण हायवेला कार चालवता चालवता कारचा दरवाजा उघडून सरळ स्टंट करायला सुरुवात करतो. यावेळी गाडीच्या टपावरही तो बसतो, त्यानंतर खाली उतरता उतरता त्याचा पाय घसरतो आणि तो गाडीबरोबर फरपटत पुढे जातो. हा जीवघेणा स्टंट त्याच्या जीवावर बेततो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @namaste.edits2.o या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने यावर लिहिलंय की, “काय मूर्खपणा आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे, खूप भयानक”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “याचं कानफाड फोडायला हवं.”