उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहणाऱ्या एका मुलाला बुलेटवर नवरी शोधणं चांगलंच महागात पडलंय. या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या जगात बराच व्हायरल झाला होता. यामध्ये तो हेल्मेट न घालताच रस्त्यावर बुलेट चालवताना दिसून येत होता. एवढंच नाही तर बाईक चालवताना तो बॉलिवूड चित्रपटातील गाणंही गातोय. हा व्हिडीओ कानपूर ट्रॅफिक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या घरी १४ हजार रुपयांचं चलान तात्काळ पाठवण्यात आलं.

नक्की काय आहे प्रकरण ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार खालिद पठाण नावाचा मुलगा कानपूरमधल्या कल्याणपूर इथल्या मस्वानपूर येथे राहतो. कल्याणपूर येथील आवास विकास रोडवर या मुलाने बुलेटवर फिरताना एका गाण्यावर व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ त्याने एप्रिल २०२१ मध्ये बनवला होता. पण आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून तो कानपूर वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमान्वये तब्बल १४ हजार रुपयांचे चलन त्याच्या घरी पाठवले. आता खालिदनेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांने सांगितले की हा व्हिडीओ सहा महिन्यापूर्वीचा आहे जो आता व्हायरल झाला आहे. पुढे बोलताना तो म्हणाला, “९ हजार रुपयांचे चलन कापले गेले आहे असं सांगण्यात येतंय. पण ते चुकीचं आहे. चलनातून १४ हजार रुपये कापले असून मी ते भरले आहेत. आता मी कधीही बाइकचे व्हिडीओ बनवत नाही. आता बनवलं तर हेल्मेट घालूनच बनवणार.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थाटामाटात निघाली होती शाही वरात, पण नवरदेवाची घोडागाडीच अचानक पेटली, पण थोडक्यात बचावला !

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एलियनसारखा दिसणारा मासा?, कपाळावर हिरवे डोळे आणि त्वचा काचेसारखी पारदर्शक! पाहून व्हाल हैराण

आता उत्तर प्रदेश पोलीस त्यांची क्रिएटिव्हीटी दाखवत हा व्हिडीओ ए़डीट करून लोकांना जागरूक करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ५७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून एक हजार लोकांनी आपल्या ट्विटर हँडलवरून तो रिट्विट केला आहे. एवढंच नाही तर २१६ लोकांनी आपलं मत व्यक्त करत हा व्हिडिओ रिट्विट केला आणि साडेतीन हजार लोकांनी त्याला लाईक केलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पोस्ट करताना यूपी पोलिसांनी लिहिले आहे की, “आजची तरूण पिढी लाइक्सच्या नावाखाली सोशल मीडियावर असे व्हिडीओ बनवतात, पण तुम्ही गाडी चालवताना खबरदारी घेतल्यास तुमचा पत्ताच कट होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा.”