Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे जी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.
या व्हिडिओमध्ये, पावसात भिजलेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या मॅनहोलमधून एक माणूस बाहेर पडताना दिसतो. दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. असाच एक व्यक्ती दारूच्या नशेत थेट मॅनहोलमध्ये जाऊन पडला. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुसळधार पाऊस पडत आहे, रस्त्यावर खूप पाणी साचलं आहे. आणि यातच एक व्यक्ती दारुच्या नशेतच या पावसात भिजत आहे. यावेळी त्याचा तोल जातो आणि तो मॅनहोलमध्ये पडतो. थोड्यावेळात तो स्वत:च बाहेर येतो. याचा त्याला इतका आनंद होतो की जणू हा कोणती लढाईच जिंकून आला आहे. हे विचित्र वर्तन नेमके कशामुळे घडले? तो सोशल मीडिया रीलसाठी परफॉर्म करत होता, अस्वस्थ होता, की पुरात मॅनहोलमधून सुरक्षित बाहेर आल्याबद्दल आनंदी होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून त्याला ५.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज, ७७,००० लाईक्स आणि ३००+ कमेंट्स मिळाल्या आहेत. दरम्यान, मूळ पोस्टमध्ये घटनेची नेमकी तारीख किंवा ठिकाण नमूद केलेले नाही.नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे या व्हिडिओवर मजेदार आणि संबंधित कमेंट्स दिल्या, काहींनी त्या माणसाला “अॅक्वामन” असे टोपणनाव दिले, तर काहींनी त्याला “अंडरटेकर” असे संबोधले आणि अनेकांनी फक्त हसणाऱ्या इमोजी वापरून प्रतिक्रिया दिल्या.