गेल्या आठवड्यात यूएस फ्लोरिडामध्ये २० टनपेक्षा जास्त बटाटा चिप्स आणि इतर वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. ७ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती मिळताच ओकला अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कारण आग विझवत असताना ट्रेलरच्या मागून चिप्सची पाकिटे वाहून जात असताना दिसत आहे. जमिनीवर चिप्सच्या पाकिटांचा जणू खच साचल्याचं दृश्य या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर करण्यात आलाय. ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बचाव पथकाने कनेक्ट केलेली होज-लाइन आणि जेट स्ट्रीम वापरल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत ट्रक जळून खाक झाला असता तर ट्रकमधील चिप्सचं मोठं नुकसान झालं असतं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ट्रकपासून ट्रेलर वेगळा केल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आणखी वाचा : डोळ्यादेखत हवेत उडू लागली मुलगी, पाहून आई घाबरून गेली; पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कोण? VIRAL VIDEO पाहून विचारात पडले नेटकरी

“इंजिन ४ आणि रेस्क्यू ३ च्या कर्मचाऱ्यांनी प्री-कनेक्टेड होज लाइनचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. एक उच्च क्षमतेचा जेट स्ट्रीमचा वापर देखली करण्यात आला.” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण ओकाला फायर रेस्क्यूच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL: बाईकवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, लोकांनी विचारले, “ऑफिसचे काम महत्त्वाचे आहे की जीव?”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. “नेहमीप्रमाणेच उत्तम काम! देवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील,” असं एका युजरने लिहिलं आहे. तर काही युजर्सनी ट्रेलरला मोकळ्या शेतात नेण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानतेचं सर्वत्र कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video truck carrying 20000 kg potato chips catches fire oh no says the internet prp
First published on: 14-07-2022 at 14:39 IST