Truck Destroyed Badly Splits Into Two Part: अपघात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अपघातग्रस्त वाहनांचे चित्र उभं राहतं. अपघात हे काही सांगून होत नसतात. एक साध्या चुकीमुळे मोठा अपघात घडू शकतो. अनेक वेळा चालकाची चूक असते तर कधी चूक नसताना अपघात घडतात. खासकरून ट्रकच्या अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एक छोटीशी चूक होत्याचं नव्हतं करू शकते. त्यामुळे ट्रक चालवणं हे काही खायचं काम नाही. अशाच एका ट्रक अपघाताचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एक ट्रक डोंगराळ भागात चालत होता. त्याचवेळी एक असं वळण आलं की चालक देखील गोंधळला. परिणामी ट्रकचा अपघात होऊन त्याचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

या व्हिडीओमध्ये ट्रकचा भीषण आणि विचित्र अपघात झाला असून हा अपघात पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सामानाची वाहतूक केली जात आहे. याच कारणामुळे चालकाला ट्रकचे संतूलन सांभाळणे अवघड होत आहे. शेवटी एका वळणाच्या ठिकाणी हा ट्रक आल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. मात्र, पुढे काही क्षणांतच समोरच्या खड्ड्यामध्ये हा ट्रक अडकला आहे. त्याच क्षणी वळणाचा रस्ता असल्यामुळे ट्रक उलटला आहे. विशेष म्हणजे ट्रक पलटतानाचे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. या अपघातात ट्रकच्या वरचा भाग खालच्या भागापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. तसेच ट्रकच्या खालचा भाग हा रस्त्यावर समोर पळताना आपल्याला दिसतो आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ग्राहकाला पार्सल देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावला डन्झो एजंट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @susantananda3 या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख २३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा अपघात नेमका कुठला आहे; याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.