Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स तयार करणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, जास्त पाण्याच्या ठिकाणी मुद्दाम जीवघेणा स्टंट करणे; अशाप्रकारच्या अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा त्यांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही दोन तरुण असाच मूर्खपणा करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेक लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रसिद्धीच्या नादात हे लोक कधीकधी आपला जीवही धोक्यात घालताना मागे पुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे पुराचे धो-धो पाणी वाहत असल्याने लोकं त्रस्त झालेले दिसत आहेत. मात्र, यावेळी दोन तरुण रील बनवण्यासाठी वाहत्या पाण्यातून चालत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठले असून या पाण्यातून दोन तरुण एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. यावेळी अचानक एकजण पाण्यात पडतो आणि पुढे वाहत जातो. सुरुवातीला हा खरोखरंच पुरात वाहून गेला असे वाटते, परंतु हे सर्व केवळ व्हिडीओ बनवण्यासाठी नाटक सुरू असल्याचे कळून येते. हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sahyadri_maza_news या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याशिवाय युजर्सही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
यावर एकाने लिहिलेय, “हे व्हिडीओसाठी नाटक करत आहेत” दुसऱ्या एकाने लिहिलेय, “यांच्याबरोबर असचं झालं पाहिजे.” आणखी एकाने लिहिलेय, “लाइक्ससाठी काहीपण करू नका, रीलच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालू नका.” आणखी एकाने लिहिलेय, “खोटं आहे भाऊ हे.”