Viral Video: देशभरात विविध रोग बळावत असताना सर्वत्र स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अशातच एक अत्यंत किळसवाणा व धक्कादायक व्हिडीओ उत्तर प्रदेशातून समोर येत आहे. यात एक भाजी विक्रेता ग्राहकांना विकण्यासाठी त्याच्या गाडीवर ठेवलेल्या भाज्यांवर थुंकताना आणि लघवी करताना कॅमेरात पकडला गेला. कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हे धक्कादायक दृश्य चित्रित केले होते.
प्राप्त माहितीनुसार बरेलीच्या इज्जतनगर भागातील ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दुर्गेश गुप्ता नामक एका व्यक्तीने हा अव्हिडीओ शूट केला असून काही कामानिमित्त कारमधून बाहेर गेला असताना त्याने हे विदारक दृश्य पाहिले. शरीफ खान असे या वयोवृद्ध भाजीविक्रेत्याचे नाव असून ते चक्क भाजीवर लघवी करताना दिसले होते. मागील ३५ वर्षांपासून ते भाजीचा व्यवसाय करतात त्यामुळे या वृद्ध व्यक्तीने इतक्या वर्षात कितीतरी जणांच्या आरोग्याशी खेळ केला आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.
भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वृत्तानुसार, अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केली होती. शेवटच्या अपडेटनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली.
पाहा व्हायरल व्हिडीओ
VIRAL: ‘या’ चुकीने ‘तो’ झाला ११,६७७ कोटींचा मालक; बँकेने पैसे परत घेण्याआधी केलं असं काही की…
दरम्यान यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे भाजी विक्रेते सांडपाण्याजवळ भाजीची लागवड करताना तसेच भाजी ताजी दिसण्यासाठी त्यावर घाणेरडे पाणी फवारताना दिसले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक फास्ट फूड विक्रेतेसुद्धा अशा प्रकारचे किळसवाणे कृत्य करताना दिसले आहेत. हेल्दी आरोग्यासाठी भाजीपाला खाणाऱ्यांना सुद्धा अशा विक्षिप्त विक्रेत्यांमुळे धोका आहे अशाही काही कमेंट्स करून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.