scorecardresearch

थंडीत सकाळी उठायला आळस येतो म्हणून ही आयडिया वापरली, एकदा हा Viral Video पाहाच

गुलाबी थंडीमध्ये अंगावरचं पांघरूण काढून अंथरूणातून बाहेर पडणं, हे किती तरी लोकांच्या जीवावर येतं. अशा लोकांसाठी हा व्हिडीओ फारच मनोरंजक आहे. एकदा हा व्हिडीओ पाहाच.

Woman-Viral-Video
(Photo: Youtube/ Viral TikTok )

थंडी सुरू झाली की सर्वात मोठा टास्क असतो तो म्हणजे सकाळी लवकर उठणे. गुलाबी थंडीमध्ये अंगावरचं पांघरूण काढून अंथरूणातून बाहेर पडणं, हे किती तरी लोकांच्या जीवावर येतं. इतक्या कडाक्याच्या थंडीत सकाळी लवकर उठून कामावर जाण्यासाठी तयार होण्यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते. तुमच्यासोबत पण असंच काही घडत असेल तर काळजी करू नका. कारण एका महिलेने यावर तोडगा काढलाय. थंडीच्या दिवसात लवकर उठून कामावर जाता यावं यासाठी या महिलेने अनोखी शक्कल लढवलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, “वाह…काय आयडिया आहे!”

थंडीच्या दिवसात कुडकुड करत अंथरूणात बाहेर पडून सकाळी कामावर जाण्यासाठी महिलांना मेकअप आणि केस व्यवस्थित करूनच मग बाहेर पडावं लागतं. पण थंडी इतकी असते की, जितका वेळ मेकअप आणि केस व्यवस्थित करण्यासाठी लागतो तितका वेळ झोपण्यात घालवणं महिला पसंत करतात. पण कामावर जाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून या महिलेने जी शक्कल लढवली ती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सकाळी उठून झोपेच्या धुंदीतच मेकअप करण्यापेक्षा या महिलेने रात्री झोपण्यापूर्वीच मेकअप आणि केस व्यवस्थित करून ठेवले. आता तुम्ही म्हणाल, रात्री झोपण्यापूर्वीच मेकअप आणि केस व्यवस्थित करून झोपल्यानंतर सकाळीपर्यंत मेकअप कसं काय शाबूत राहिल? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तिने याचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आणखी वाचा : अन् बघता बघता कागदाप्रमाणे पूल वाहून गेला…हे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिचे पोनीटेलमध्ये केस बांधताना दिसतेय. तिचे कर्ल करताना ती दिसून येतेय. त्यानंतर चेहऱ्यावर फाउंडेशन, कन्सीलर, मस्करा आणि आयब्रोज करतेय. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही शिक्षीका असून तिचं नाव हॅना असं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या चिमुकल्याने आईकडे स्वतःच्या लग्नासाठी तगादा लावला; म्हणतो, “माझेही मुलं होतील!”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीने स्वतःच्याच लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय की बघणारे फक्त बघतच राहिले

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करत आपली मते व्यक्त केली आहेत. तिच्या अनेक फॉलोअर्सनी तिच्या त्वचेसाठी तिची दिनचर्या किती वाईट आहे हे सांगितलं. परंतु तिने आग्रह धरला की, ती सुमारे एक दशकापासून अशा प्रकारे तयार होत आहे आणि तिला कधीही ब्रेकआउट किंवा मुरुमांचा त्रास झाला नाही.” यापुढे बोलताना ती म्हणाले, “ती अजूनही तिच्या त्वचेची काळजी घेते. ती कामावरून घरी येताच तिचा मेकअप उतरवते आणि त्यानंतर तिच्या स्किनकेअरवर लक्ष केंद्रित करते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video woman who is too lazy to get up early for work does her make up and hair before bed prp