Viral Video: प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आयुष्यात सुखाचे अनेक क्षण येतात, तर कधी एकामागे एक दुःखाच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण, एक माणूस म्हणून आलेल्या प्रत्येक संकटावर मात करणं महत्त्वाचं आहे. दुःखात दिवस-रात्र होरपळणारीच माणसं एक दिवस यशाचे शिखर पार करतात. पण, त्यासाठी संयम राखणं महत्त्वाचं असतं. मात्र, अनेकदा काही जण आलेल्या दुःखावर मात करण्यास स्वतःला असमर्थ ठरवतात आणि जीवाचं काहीतरी बरं-वाईट करण्याचा विचार करतात. माणसाचा जन्म मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, हे बहुधा ते विसरून जातात. सोशल मीडियामुळे आजपर्यंत तुम्ही आत्महत्या करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल.

काही जण गोष्टी मनासारख्या झाल्या नाही की, लगेच चिडचिड करतात, नाराज होतात. त्यात कधी मनासारखी नोकरी किंवा कॉलेज न मिळणे किंवा आवडीच्या व्यक्तीकडून प्रेमात धोका किंवा नकार मिळणे, कौटुंबिक अत्याचार, पती-पत्नीतील वाद अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. परंतु, या सर्व गोष्टी आयुष्याचा भाग आहेत. काही जण अशा गोष्टींचा सामना न करता, स्वतःला संपण्याचा विचार करतात. आताही असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तलावाच्या काठावर एक महिला बसली होती. यावेळी तलावाच्या आजूबाजूला फिरत असलेल्या लोकांमधील एका व्यक्तीला ती पाण्यात उडी मारून आत्महत्या करणार असल्याची शंका येते. त्यामुळे तो तिला पकडण्यासाठी तिच्याजवळ धावत जातो; पण तितक्यात ती महिला पाण्यात उडी मारते. या व्हिडीओमध्ये ही घटना पूर्ण दाखवण्यात आली नसली तरी या घटनेत महिलेला वाचवण्यात आले आहे. ही घटना हैदराबादमधील हुसेन सागर तलावातील आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर इन्स्टाग्रामवरील @anay.akhan55794 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्युज अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करीत आहेत.