Viral Video: लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य असून जगप्रसिद्ध आहे. मराठी लोकनाट्यामध्ये लावणीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सोशल मीडियावर अनेक जण लावणी सादर करताना दिसतात. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा लावणी सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लावणी डान्सर खूप सुंदर लावणी सादर करताना दिसतो. शिवाय यावेळी त्याच्याबरोबर एक चिमुकलीही लावणी सादर करताना दिसतेय.
हल्ली सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणत्याही अश्लीलतेऐवजी सुंदर हावभाव आणि स्टेप्सचे दर्शन झाले. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, ज्यात एक तरूण आणि चिमुकली एकत्र लावणी सादर करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान चिमुकली संपूर्ण साजशृंगार करून, लावणीचा तोडा सादर करीत आहे. लावणीचा तोडा सादर करताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून समोर उभे असलेले प्रेक्षकही तिला दाद देताना दिसत आहेत. शिवाय यावेळी तिचे लावणी शिकवणारे शिक्षकही तिला उत्तम साथ देताना दिसत आहे. दोघांचा हा तोडा पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्टाग्रामवरील @rajdancer2021 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत पाच लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेकजण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स केला, दिदीचा पण विषय हार्ड” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूपच सुंदर केलं दोघांनी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खुपच छान लावणी सर”