Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच; पण त्या लावणीमध्ये एक ठसकेबाजपणा, नजाकत असावी लागते. हल्ली सोशल मीडियामुळे एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातील काही मोजक्याच व्हिडीओतील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक तरुणी खूप सुंदर लावणी करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी नऊवारी नेसून एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये “मला पिरतीच्या झुल्यात झुलवा”, या गाण्यावर सुंदर लावणी सादर करतेय. तिच्या भन्नाट लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील अदाकारी पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ @varadavishwanath या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज अन् अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “अशी असते अस्सल लावणी” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर गं माझी मैना ” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखुळा गं”