Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक सुंदर लावणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर लाखो युजर्स विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करत असतात. ज्यातील अनेक व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. सोशल मीडियाचा ट्रेंड सातत्याने बदलत असतो. या ट्रेंडमध्ये अनेकदा नवी, जुनी गाणी देखील असतात. आता अशाच एका नव्या गाण्यावर तरूणी लावणी सादर करताना दिसतेय.

या व्हायर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसून आणि मराठमोळा साजश्रृंगार करून “फुलवंती” या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर सुंदर लावणी सादर करताना दिसतेय. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_aishwarya21 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “याला म्हणतात खरी लावणी”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अस्सल महाराष्ट्रीयन सांस्कृतिचा उत्तम नजारा आहे”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “ताईसाहेब लय सुरेख दिसताय राव मायच्यान कार्यक्रम संपला की नजर काढा”