Viral Video: सोशल मीडियाआधीचे जग आणि सोशल मीडियानंतरच्या जगात जमीन-आसमानाचा फरक पाहायला मिळतो. आताची पिढी सोशल मीडियामध्ये मग्न झालेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आकर्षित करेल अशाप्रकारचे नवनवीन कटेंट असतात. ज्याला कितीही नाही म्हटलं तरी अनेकजण आपल्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवतात. परंतु सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्यही बदलू लागले आहे. यामुळे अनेक कलाकारांच्या केलेला वाव मिळत आहे. शिवाय हे कलाकार त्यातून पैसेही कमावत आहेत.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. परंतु कधीकधी काही कलाकार केवळ प्रसिद्धीसाठी अश्लील नृत्य करताना दिसतात. पण काही कलाकार असेही आहेत जे आपली भारतीय संस्कृती जपत सादरीकरण करतात. आता अशाच एक तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी काष्ठी साडी नेसून डोंगराळ परिसरात ‘वादळ वारा सुटला गं ’ या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील सुंदर हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehapatil1507 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारों व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप छान नाचतेस तू”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “कमाल केलीस तू”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मस्त केलास ताई डान्स”