Virat Kohli Daughter Vamika: विराट आणि अनुष्काची मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद; फोटो पाहिलात का?

अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये आपल्या मुलीसोबत उभी असतानाच कॅमेरा त्यांच्यावर गेला

virat kohli daughter vamika first picture, Virat Kohli Daughter, virat kohli daughter vamika first picture
अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये आपल्या मुलीसोबत उभी असतानाच कॅमेरा त्यांच्यावर गेला

Virat Kohli Daughter Vamika first picture: कसोटीतील नामुष्कीनंतर एकदिवसीय मालिकाही गमावणारा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. आफ्रिका दौऱ्याची किमान विजयी सांगता करण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक आहेत. मात्र यावेळी विराटच्या चाहत्यांना उत्सुकता असणारी एक गोष्ट समोर आली आहे. विराट कोहली आणि अनुष्काची मुलगा सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

विराट कोहली आणि अनुष्का नेहमीच आपली मुलगी वामिकाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांनी फोटो काढू नये तसंच प्रसिद्ध करु नयेत यासाठी विनंतीही केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाचा वामिका समोर आली आहे.

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये आपल्या मुलीसोबत उभी असतानाच कॅमेरा त्यांच्यावर गेला. गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या वामिकाला अनुष्काने कडेवर घेतलं होतं. यानिमित्ताने विराट कोहलीची पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडियाबद्दल कळत नाही तोपर्यंत तिला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय विराट आणि अनुष्काने घेतला आहे. त्यामुळेच ते नेहमी तिचे फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध न करण्याची विनंती करत असतात.

विराट कोहली आणि अनुष्काची मुलगी वामिका जानेवारीत एक वर्षाची झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना खेळत असतानाच वामिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

याशिवाय विराट कोहली जेव्हा केपटाऊनध्ये कसोटी सामना खेळत होता तेव्हा मैदानातूनच मुलगी वामिकाला हात दाखवत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli daughter vamika first picture anushka sharma india south africa odi match sgy

Next Story
Video: लसीकरणासाठी रस्त्यावरील मुलांना बोलावणाऱ्या महिलेचा हा अंदाज बघून तुम्ही आवरणार नाही हसू!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी