लग्न झाल्यानंतर पत्नीसमोर नमते घ्यावे लागणाऱ्या पुरूषांचे किस्से, व्यथा आपण नेहमीच ऐकत असतो. प्रत्येक पुरूषाला आपण एकटेच अशाप्रकारच्या परिस्थितीला सामोरे जातोय, असे वाटत असते. मात्र, याबाबतीत पुरूष किती समदु:खी आहेत, याचाच प्रत्यय वीरेंद्र सेहवागच्या एका ट्विटमुळे येत आहे.

ट्विटरवरील शाब्दिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वीरेंद्र सेहवागने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला होता. या फोटोत सेहवाग आणि त्याची पत्नी खुर्चीवर बसले आहेत. हा फोटो ट्विटरवर शेअर करताना सेहवागने त्याच्या हटके स्टाईलमध्ये फोटोला कॅप्शन दिली होती. त्यानंतर सेहवागचे चाहते या फोटोवर भरभरून व्यक्त होत आहेत.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज ट्विटपेक्षाही लहान!

माझ्या बायकोने मला राजाचा दर्जा दिला आहे. हे म्हणजे बुद्धीबळाच्या खेळाप्रमाणे आहे. यामध्ये राजा एकावेळी फक्त एकच पाऊल चालू शकतो तर राणी मात्र तिला हवे ते करू शकते, असे सेहवागने म्हटले आहे. याशिवाय, या कॅप्शनसोबतच सेहवागने ‘#हजबंड’ऐवजी ‘#हसीबंद’ असा मजेशीर हॅशटॅग वापरला आहे. सेहवागच्या या ट्विटवर अनेक ‘समदु:खी पुरूष’ प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ही अवस्था फक्त तुमच्या एकट्याची नाही. फरक इतकाच आहे की, लोक कुणाला काही सांगत नाहीत, अशा धाटणीच्या अनेक कमेंटस या फोटोवर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत १७ हजार जणांनी हा फोटो लाईक केला आहे.

गांगुली, वॉर्न स्वप्नांचा पाठलाग करतायत; दिग्गजांच्या ‘झोपे’वर सेहवागचे मिष्किल ट्विट

https://twitter.com/ruhi9336302/status/871699605250916353