बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा | Watch how man prevents his son from falling off a moving scooter video goes viral | Loksatta

बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे

बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा
बाइकवरून जाणाऱ्या वडिलांचा आणि मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईविना कोणत्याही बाळाचे जग पूर्ण होऊच शकत नाही. पण आईइतकेच वडिलही तितकेच महत्त्वाचे असतात. वडिलांचा भक्कम आधार आपल्याला आयुष्यात कोणतीही उंची गाठायला पुरेसा असतो. आई वडिलांचे मुलांवर नितांत प्रेम असते, कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना काही त्रास होणार नाही याची ते काळजी घेत असतात. याचीच प्रचिती येणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस त्याच्या मुलासह स्कूटरवरुन प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. स्कूटरवर मागे बसलेला हा मुलाला झोप लागली आहे, त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडू नये यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पकडले आहे. म्हणजेच ते एका हाताने स्कूटर चालवत आहेत आणि दुसऱ्या हाताने मुलाला पकडले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

व्हायरल व्हिडीओ:

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत असून, या वडिलांच्या प्रेमाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 19:07 IST
Next Story
माकडाने कहरच केला, वाघासोबत कुस्ती खेळायला गेला अन्…; Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले “याला मोठा होऊ द्या”