कुत्रा म्हणजे प्रामाणिक आणि इमानदार प्राणी. हा पाळीव प्राणी म्हणजे अनेकांच्या घरातील सदस्यच. मग मालक आल्यावर त्याच्या पायाशी घोळणारा कुत्रा पाहिला की मुक्या प्राण्यांमध्येही किती भावना असतात हे दिसून येते. अनेक जण त्याला आपली भाषा शिकवतात. बऱ्याचदा अगदी लहान लहान मुलेही या भल्या-मोठ्या कुत्र्यांबरोबर खेळताना दिसतात. मग कुत्रेही आपल्या करामती दाखवत कधी घरातल्या लोकांचे मनोरंजन करतात तर कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देतात. नुकताच अशाप्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये हा कुत्रा अतिशय अवघड अशी करामत अगदी सहज करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता आणि कॉमेडियन सेठ रोगेन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्रा एका बंगल्याच्या दिशेने नेहमीप्रमाणे धावत येत असल्याचे दिसत आहे. यानंतर दरवाजाजवळ आल्यावर लोखंडी दरवाजातून हा कुत्रा अतिशय शिताफीने आतमध्ये उडी मारतो. लोखंडांच्या आडव्या दांड्यांतून आत जाताना हा कुत्रा आपले शरीर कशापद्धतीने वळवतो ते दिसत आहे. आपण काहीतरी वेगळे केले असा भावही त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर दिसत नसल्याने त्याच्यासाठी हे नेहमीचेच असल्याचे आपल्याला दिसते. याशिवाय दरवाजाच्या आत गेल्यावर तो बाहेरच्या लोकांवर जोरजोरात भुंकतो. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो आतापर्यंत १ लाख २० हजार जणांनी रिट्विट केला असून २ लाख जणांनी तो लाईक केला आहे.

आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत अनेकजण जेवतात अगदी त्याला जवळ घेऊन झोपतातही. हे कुत्रे त्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणारा एक सदस्यच असतो. त्यामुळे अनेकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाळीव कुत्र्याचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. नुकताच बंगळुरुमध्ये एका मुलीने आपला पाळीव कुत्रा मेल्याने आत्महत्या केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch how this dog jumps through gate bars before barking
First published on: 26-09-2017 at 16:36 IST