सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून ‘पावरी हो रही हैं’ ट्रेण्ड चांगलाचं धुमाकूळ घालत आहे. २०२१ मधील हा पहिलाच सर्वात मोठा ट्रेण्ड ठरतोय. भारत आणि पाकिस्तानमध्येही या ट्रेण्डचा चांगलाच बोलबाला आहे. सर्वसामान्यांपासून ते ब्रॅण्ड आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या ट्रेण्डमध्ये सहभागी झालेत. अगदी काही ठिकाणच्या पोलिसांनाही या ट्रेण्डमध्ये अगदी मजेदार पद्धतीने आपला सहभाग नोंदवलाय. असं असतानाच आता भारतीय लष्करातील जवानांनाही या ट्रेण्डला फॉलो करत एक मजेदार व्हिडीओ शूट केला असून सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
‘प्रधानमंत्री गर्लफ्रेण्ड दिलवाओ योजना सुरु करा’; जाणून घ्या ‘मोदी गर्लफ्रेण्ड दो’, ‘मोदी बॉयफ्रेण्ड दो’ ट्रेण्डबद्दलhttps://t.co/pe1ZlrXoi6
ट्विटरवर #modi_rojgaar_दो नंतर #modi_boyfriend_do आणि #modi_girlfriend_do हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये#PMModi #Modi #TwitterTrend #Trend— LoksattaLive (@LoksattaLive) February 23, 2021
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय लष्करामधील एक जवान दानानीर मोबीन या तरुणीची नक्कल करताना दिसत आहे. दानानीर हिच्याच पार्टीऐवजी पावरी उच्चारावरुन हा ट्रेण्ड सुरु झाला होता. व्हिडीओमधील भारतीय जवान हे एका बर्फाळ प्रदेशामध्ये हातामध्ये बंदुका घेऊन सीमांचे रक्षण करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील एक जवान, “ये हम हैं, ये हमारी गन हैं और हम याहा पेट्रोलिंग कर रहे हैं” असं म्हणताना दिसतो. या व्हिडीओमधील जवान कॅमेरा फिरवून ते कुठे तैनात आहेत याची झलकही व्हिडीओमध्ये दाखवताना दिसतो.
आयएएस अधिकारी असणाऱ्या अविनाश सारन यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो अधिक व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा या ट्रेण्डमधील सर्वोत्तम व्हिडीओ असल्याचे म्हणत सैनिकांचे कौतुक केलं आहे.
Best #yehumhain so far. pic.twitter.com/pVaX4iqv9D
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 18, 2021
नेटकऱ्यांचे म्हणणे काय पाहुयात…
१)सर्वात भारी
Seriously the best ever https://t.co/BRLTiUgnXU
— Adv.Abhisek Samantray (@Asamantray) February 18, 2021
२) हे लोकं सारी काही एन्जॉय करतात
They have developed the habit of enjoying every moment.
Jai Hind https://t.co/7kab89CnRJ— JAGADISHA भारतीय (@jayjagadisha) February 18, 2021
३) हे लोकं महान आहेत
Legends… taking time to thot patrol, while patrolling…
Will someone fetch these kings their crowns?https://t.co/UORspsjqkw
— manwithabigstick (@bahutbadadanda) February 19, 2021
४)आतापर्यंतचं सर्वोत्तम
Best one so far https://t.co/BRuT3bVBUS
— Sona Dabas (@Khra_sona) February 18, 2021
५) तुम्हाला अधिक ताकद मिळो
The best one thus far More strength to our soldiers !! https://t.co/dF7fL2boEl
— AdityaPSingh (@adityapsingh10) February 18, 2021
६)एकदम कूल
this is so coool https://t.co/Rf6Zp3R9ES
— Mrinalika Srivastava (@mrinalikaaa) February 18, 2021
७) सलाम तुम्हाला
Salute to the spirit… https://t.co/yUMoGspIoQ
— Hope (@tajone) February 21, 2021
८)ओरिजनलपेक्षाही उत्तम
By gawd,, better than the original ,, so cute https://t.co/qfW8L6pddN
— Vee (@_BlessedCurse) February 21, 2021
९)आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धन्यवाद
Best #PawriHoRaiHai
God bless these souls and their love to keep us secure. https://t.co/A09Z8N3METThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Jaskaran S Chawla (@_blackleather) February 22, 2021
१०) मी २३ वेळा पाहिला
I watched this 23 times on loop
Its insane how they manage to find a reason to laugh n make us laugh considering the where n how they are https://t.co/5wft899a2Z— Salman was driving the car on 28 Sep 2002 (@DroveCar) February 19, 2021
मागील अनेक दिवसांपासून हा ट्रेण्ड चर्चेत असून अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता शाहीद कपूर यासारख्या बड्या कलाकारांंनीही सोशल नेटवर्किंगवरुन या ट्रेण्डच्या ‘पावरी’मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.