Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. हा व्हायरल व्हिडीओ धावत्या ट्रेनमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही महिला जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओ धावत्या ट्रेनमधील आहे. या ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे की लोक दरवाज्याजवळ उभी राहून जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला काही महिला दिसतील. ज्या ट्रेनच्या दरवाज्याबाहेर उभ्या राहून प्रवास करत आहे. हा जीवघेणा प्रवास पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. महिला जीवाची पर्वा न करता हा प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Wacth Viral Video)
official_vishwa_96k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कृपया सावधगिरीने प्रवास करा , तुम्हाला दुसरी ट्रेनही मिळू शकते! पण आई वडिलांना दुसरी मुलगी मिळू शकणार नाही.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्या जीवापैक्षा मोठे काहीही नाही” तर एका युजरने लिहिलेय, “सांभाळून हो. इतकी रिस्क नका घेत जाऊ. तुमच्या मागे तुमच्या घरचे तुम्ही घरी यायची वाट पहात असतात हो” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला नरक आयुष्य म्हणतात”
हा व्हिडीओ कदाचित मुंबईच्या लोकल ट्रेनचा असल्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये लोकल ट्रेनमध्ये लोक जीवघेणा प्रवास करताना दिसले आहे. अशा जीवघेणा प्रवासात अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरी पाच मिनिटे उशीरा गेले किंवा दुसऱ्या ट्रेननी घरी गेले तरी चालते, यामुळे आपल्याला जीवघेणा प्रवास टाळता येतो.