लग्नात सात फेरे घेण्यापूर्वी मंगलाष्टक आणि वरमाला घालण्याचा विधी असतो. अनेक लग्नात मंगलाष्टक झाली की, वधूवरांना वर उचललं जातं. वरमाला घालताना चढाओढ लागलेली दिसते. मित्र वधूवरांना वर उचलत वरमाला विधीत रंगत आणतात. थोडी गंमत झाल्यानंतर वरमाला घातली जाते. वरमाला विधीदरम्यान कधी कधी वराला राग येतो. तर कधी वराचे मित्र वधूवरांची टिंगलटवाळी करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वराने वरमाला घालण्यापूर्वी ठेवलेली अट पाहता मंडपातील वातावरणच बदलून गेलं. वराची अट ऐकून वधूलाही लाज वाटली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लग्न मंडप दिसत आहे. वधूवर एका स्टेजवर उभे आहेत. वरमाला घालण्याचा विधी सुरु होणार असल्याने दोघांच्या हातात पुष्पहार आहेत. वधूने वराच्या गळ्यात वरमाला घातली. पण ऐनवेळी वराने वरमाला घालण्यास मनाई करत एक अट ठेवली. गालावर किस केल्याशिवाय वरमाला घालणार असं सांगतो. ही अट ऐकून वधूही लाजते. मात्र थोड्या वेळानंतर ती वराने ठेवलेली अट पूर्ण करते. यानंतर वराचे मित्र एकच जल्लोष करतात.

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या व्हिडिओला अनेकांनी मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, आता लग्नानंतर तुला तिचंच ऐकायचं आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, वधूच्या बोटांवर नाचायला तयार राहा.