Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील गमती जमतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नातील डान्स असो किंवा गाणी असो, प्रथा असो किंवा इतर काही सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा लग्नात असे किस्से घडतात की पोट धरून हसायला येतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला पाहून नवरदेव असं काही करतो की कोणीही थक्क होईल. नेमकं काय घडतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. स्टेजवर तुम्हाला नवरदेव नवरी दिसेल. फोटोग्राफर नवरीचा फोटो शूट करत आहे. नवरीचा फोटो काढताना तो नवरीला चांगल्या पोझ द्यायला सांगतो. शेजारी नवरदेव उभा असतो, ते सर्व बघत असतो. फोटोग्राफर पोझ देताना नवरीच्या चेहऱ्याला हात लावून चेहरा वळवण्यासाठी सांगतो. हे एकदा नवरदेव बघतो पण दुसऱ्यांदा फोटोग्राफर पुन्हा तेच करतो तेव्हा नवरदेवाला हेवा वाटतो आणि लगेच फोटोग्राफर झापड मारतो. नवरदेवाचा पजेसिव्ह अंदाज पाहून नवरीला हसू आवरत नाही. जेलस झालेल्या नवरदेवाला पाहून ती पोट धरून हसायला लागते आणि खाली बसून जोरजोराने हसते. नवरदेवाची ही रिअॅक्शन बघून फोटोग्राफर सुद्धा हसतो. त्यानंतर क्षणभरात नवरदेवासह सर्व जण हसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Rosie या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेलस नवरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नवरा असावा तर असाच” तर एका युजरने लिहिलेय, “मला असाच प्रेम करणारा नवरा भेटायला पाहिजे” काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. लग्नसमारंभातील अशा गंमतीजमती नेहमीच व्हायरल होतात पण हा प्रसंग नेमका कॅमेऱ्यात कैद झाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.