भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष महत्त्व आहे. भारतातील विवाह हा एखाद्या सामाजिक सणासारखा असतो, ज्यामध्ये दोन लोक, दोन कुटुंब वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून एकमेकांचे बनतात. यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. यापैकी काही परंपराच आपल्याला माहित असतात. तर बऱ्याच परंपरांबद्दल तर आपल्याला माहिती देखील नसतं. दरम्यान अशाच एका विधी दरम्यानचा धक्कादायक प्रकार व्हायरल होत आहे. लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. काही विधी सुरू आहेत. इतक्यात एक परंपरा सुरू होते. ज्यात वर पक्ष आणि वधू पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही बाजूकडील लोकांच्या मध्ये एक कापड असतं. हे कापड खेचण्याची स्पर्धा त्यांच्यात लागतं. पाहा व्हिडीओ हेही वाचा - पँटची चैन उघडी राहिल्यास आता फोनवर येईल अलर्ट, पाहा नक्की काय आहे टेक्नॉलॉजी काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना थक्क करत आहे. सुरुवातीला तुम्हालाही हा व्हिडीओ गंभीर वाटेल पण नीट पाहिलं तर तुम्हाला हसू येईल.हा व्हिडीओ धक्कादायक आहे. पण एकंदर व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण यात हसताना दिसत आहे. म्हणजे लग्नाची एक परंपरा आहेत, ज्यात चुकून सर्वजण नवरीवर पडले आणि नवरीसोबत असं काहीतरी घडलं.