Viral Video: आजकाल सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतो, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नीचा सुंदर डान्स पाहायला मिळत आहे.
नृत्य ही एक खूप सुंदर कला आहे; परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये पती-पत्नीची जोडी खूप साध्या आणि सुंदर पद्धतीने ‘ओ मेरे ढोलना, ओ मेरे सजना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या दोघांच्या डान्स स्टेप्सही खूप सुंदर आणि चेहऱ्यावरील हावभावही खूप निरागस आहेत. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhavana_mukati या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत अनेक ४० दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
एकाने लिहिलेय, “संस्कारांबरोबर मर्यादाही राखली”. दुसऱ्याने लिहिलेय, “मर्यादेत राहून सर्वांत सुंदर डान्स”. आणखी एकाने लिहिलेय, “काय सुंदर नाचली”.