कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असं म्हणतात, सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका व्यक्ती रातोरात लखपती बनला आहे. खरं तर, लॉटरीच्या मदतीने अनेक लोक रात्रीत श्रीमंत झाल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावर वाचत आणि पाहत असतो. लॉटरी अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानली जाते तर काही देशांमध्ये लॉटरी खेळण्याला परवानगी दिली जाते. सध्या याच लॉटरीमुळे एका व्यक्तीचे आयुष्य पालटून गेलं आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तर हा व्यक्ती नेमका कसा लखपती बनला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सँडविच आणायला गेला आणि पालटलं नशीब –

मिळालेल्या मागितीनुसार, व्हर्जिनियातील सेंटरव्हिल येथील कार्लोस गुटीरेझ नावाचा व्यक्ती काही क्षणात लखपती बनला आहे. महत्वाची बाब म्हणजे गुटीरेझ श्रीमंत होण्याला चिकन सँडविच कारणीभूत ठरलं आहे. कारण गुटीरेझ एका शॉपमध्ये चिकन सँडविचची ऑर्डर येण्याची वाट पाहत थांबला होता. यावेळी त्याची नजर शेजारी असलेल्या लॉटरी वेंडिंग मशीनवर पडली आणि त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि तिकिट खरेदी करुन तो घरी गेला.

हेही वाचा- वृद्ध महिलेच्या अंगावर सांडली गरम कॉफी, कंपनीला द्यावी लागली तब्बल २४ कोटींची भरपाई, संपूर्ण प्रकरण वाचून थक्कच व्हाल

व्यवसायासाठी वापरणार पैसे

लॉटरी खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशी गुटीरेझ त्याच दुकानाजवळून निघाला तेव्हा त्याने घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटावर १ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस लागल्याचे त्याने पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. गुटीरेझच्या तिकिटावर लिहिलेले ५ आकडे मशिनमध्ये एकत्र आल्याचे त्याला दिसले. त्याच्या तिकिटावर असलेले आकडे आणि मशीनवरील सर्व आकडे समान आल्याचे दिसल्यानंतर तोच या लॉटरीचा विजेता असल्याचं निश्चित झालं. त्यानंतर गुटीरेझने एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर लॉटरी कंपनीच्या अधिकाऱ्याने गुटीरेझला या पैशाचे काय करणार? असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की, छोट्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या पैशांचा वापर करणार.