पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकप्रियतेमुळे कायमच चर्चेत असतात. मात्र रविवारी त्यांचा वेगळाच अंदाज दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान दिसून आला. रस्त्याच्या कडेला दुकानं मांडून व्यवसाय करणाऱ्या येथील काही स्थानिक दुकानदारांसोबत चर्चा करता करता ममता बॅनर्जींनी चक्क पाणीपुरी बनवून आपल्या सहकाऱ्यांना आणि तेथील पर्यटकांना दिल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> पूर आलेल्या नदीतून विद्यार्थ्यांचा प्रवास; अंगावर काटा आणणारा Video व्हायरल झाल्यावर शिक्षणमंत्री म्हणतात, “मला…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जी पाणीपुरी बनवतानाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी पाणीपुऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पुऱ्यांमध्ये उकडलेला बटाटा वगैरे भरुन चिंचेच्या पाण्यात बुडवून लोकांना देताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये पाणीपुरीला पुचका असं म्हटलं जातं. स्वयंरोजगार करणाऱ्या एका महिलेच्या पाणीपुरी स्टॉलला ममता बॅनर्जींनी भेट दिली. दार्जिलिंगमधील हाट येथील दौऱ्यावर असतानाच हा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसने ट्विट केलाय.

“आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी दार्जिलिंगमधील हाट येथे एसएचजीच्या (सेल्फ हेल्प ग्रुप) माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या एका फूड स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी कष्टकरी महिलांचं कौतुक करण्याबरोबरच पश्चिम बंगालमधील लोकप्रिय पुचकाही तयार करुन तेथील मुलांना खाऊ घातला,” अशी कॅप्शन तृणमूल काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना दिलीय.

नक्की पाहा >> Video: …अन् काही क्षणांमध्ये गाडी पूराच्या पाण्यात वाहून गेली; असा मूर्खपणा कृपया करू नका

नव्याने निवडून आलेल्या गोरखालॅण्ड टेरिटोरिअल अॅडमिनिस्ट्रेशनच्या सदस्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी दार्जिलिंगला आल्या होत्या. मागच्या वेळेस त्यांनी अशाच प्रकारे मोमोज हा येथील स्थानिक लोकप्रिय पदार्थ एका फूड स्टॉलवर तयार केला होता. २०१९ च्या दौऱ्यामध्ये त्यांनी दिघा येथील रिसॉर्टवरील स्टॉलवर लोकांना मोमोज खाऊ घातलेले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal chief minister mamata banerjee serves panipuri at a stall during her visit to darjeeling scsg
First published on: 13-07-2022 at 14:18 IST