अलिबाग: महिलेवर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुरेश लहानु नाईक, विशाल कृष्णा म्हात्रे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. सदर घटना ही १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास तळाशेत वडवली मार्गावरील एका टेकडीवर घडली होती. पिडीत महिला आपल्या मुलीकडे जात होती. एकटी जात असल्याचे पाहून दोन्ही आरोपींनी तिला पाठीमागून पकडून बळजबरीने बाजूला असलेल्या झाडी झुडपात नेले. त्यानंतर तिला जबरदस्ती मद्य प्राशन करण्यास भाग पाडले. नंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेचा शोध घेत आलेल्या तिच्या नातेवाईकांनी ही घटना पाहीली, त्यांनी दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला असता आरोपींकडून दगडफेक करण्यात आली.

हेही वाचा : ‘आम्हाला शरद पवारांचा पराभव हवा’; चंद्रकांत पाटील यांचं विधान चुकीचं, अजित पवार म्हणाले, “मी त्यांना..”

dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
eknath shinde criticized uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 : उबाठा आधीच ‘लीन’, आता त्यांना विलीन व्हायचे असेल – मुख्यमंत्र्यांची टीका
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात दोघांवर भादवी, कलम ३७६(ड), ३३६, ३२८, ३६ सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१)(डब्ल्यू) (आय) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबागच्या तत्कालीन पोलीस उप अधिक्षक अधिकारी सोनाली कदम यांनी या प्रकरणाच्या तपास करून आरोपींविरोधात अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस राजंदेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अॅड. स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण १५ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत महिला, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार, रासायनिक विश्लेषक आणि पोलीस उप अधीक्षक सोनाली कदम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

हेही वाचा : राज्याच्या अर्थव्यवस्थेत एक टक्क्यांचे योगदान

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने, विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि दोन्ही आरोपींना दोषी ठरविले. दोघांना दहा वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आणि दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.