उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सरकार स्थापन करताना दिसत आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधलं जात आहे. निवडणुका जाहीर होताच भाजाने जाहिरनाम्यात अनेक आश्वासनं दिली होती. त्यामुळे येत्या पाच वर्षात भाजपा सरकारला ही आश्वासनं पूर्ण करावी लागणार आहेत. कोण कोणती आश्वासनं दिली होती पाहूयात.

  • शेतकऱ्यांना मोफत वीज: भाजपने पाच वर्षांसाठी सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने सरकार आल्यास १४ दिवसांत उसाचे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले आहे. विलंब झाल्यास व्याज दिले जाईल.
  • गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत: मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत आर्थिक मदत १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • मोफत सिलेंडर: पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवशी दोन मोफत LPG सिलिंडर दिले जातील.
  • रोजगार: पाच वर्षात ३ कोटींहून अधिक नोकऱ्या देण्याचा दावा करत भाजपा पुढील पाच वर्षात प्रत्येक कुटुंबाला किमान एक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी देणार आहे.
  • मोफत स्कूटी: राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

VIDEO: भाजपाच्या विजयासाठी ‘मिरची यज्ञ’, ११ पुरोहितांनी १ क्विंटल मिरच्यांची आहुती देत योगींना मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

Chandrashekhar Bawankule, wardha,
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ‘या’ विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्याची अपेक्षा
mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
violence in bengal before election
NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
  • स्मार्टफोन आणि टॅबलेट: स्वामी विवेकानंद युवा शक्तीकरण योजनेंतर्गत २ कोटी टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वाटप केले जाणार आहे.
  • मोफत प्रशिक्षण: अभ्युदय योजनेंतर्गत UPSC, UPPSC, NDA, CDS, JEE, NIIT, TET, CLAT आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत कोचिंग सुविधा दिली जाईल.
  • वाढीव पेन्शन : भाजपाने विधवा आणि निराधार महिलांना मिळणारे पेन्शन १५०० रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पेन्शन दरमहा एक हजार रुपये होती.
  • मोफत प्रवास: ६० वर्षांवरील महिलांना सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.