Viral Video : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. हा एक घाटरस्ता आहे जो रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडतो. ताम्हिणी घाटाच्या सभोवताल सुंदर, निसर्गरम्य धबधबे, तलाव, आणि घनदाट जंगल आहे. पावसाळ्यात ताम्हिणी घाट स्वर्गमय होतो. त्यामुळे अनेक पर्यटक पावसाळ्यात आवर्जून ताम्हिणी घाटला भेट देतात. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्या ठिकाणचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्हिडीओने तर सर्वांचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात लोक ताम्हिणी घाटला फिरायला का जातात, याचे उत्तर तुम्हाला या व्हिडीओत दिसेल.

ताम्हिणी घाटातील सुंदर दृश्य

हा व्हायरल व्हिडीओ ताम्हिणी घाटातील रस्त्यावरचा आहे. वाहने ये जा करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्हाला विलोभनीय दृश्य दिसेल. हे दृश्य पाहून तुम्हाला तेथील वातावरणाचा अंदाज लावता येईल. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे- रिमझिम पाऊस पडतोय. वातावरणात गारवा आहे. आकाशात ढग जमा झालेले आहेत. क्षणभरासाठी तुम्हाला वाटेल की ढग तुमच्या भेटीला आले आहे. स्वर्गमय वातावरण निर्माण झाले आहे. काही लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून घाटातील या सुंदर दृश्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

everythingaboutpune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय सुंदरता आहे. मला लवकरच या ठिकाणी जायचं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सफर खुबसुरत है मंजिल से भी” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताम्हिणी घाट हे अप्रतिम ठिकाण आहे. फक्त काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे.” एक युजर लिहितो, “वीकेंडला शक्यतो जाणे टाळा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे त्यामुळे जागोजागी तुम्हाला दरी, धबधबा आणि तलावाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. घाटाचा रस्ता असल्यामुळे नीट वाहन चालवणे, ट्रॅफिक टाळण्यासाठी शक्यतो वीकेंडला घराबाहेर न पडणे गरजेचे आहे.