विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. यासाठी अनेकजण या कंपन्यांमध्ये निघणाऱ्या ओपनिंगकडे लक्ष ठेऊन असतात. मात्र हे स्वप्न पाहणाऱ्या हजारो फ्रेशर्सना धक्का बसला आहे. कंपन्यांकडून ऑफर लेटर्स आल्याने आनंदात असणाऱ्या तरुणांना कंपनीने जोरदार धक्का दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या नामांकित कंपन्यांनी तरुणांना आधी नोकरीचे ऑफर लेटर्स पाठवले. खरं तर त्यानंतर ऑनबोर्डिंग प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे होती. मात्र या कंपन्यांनी तसं न करता जवळपास चार ते पाच महिने निघून गेले. आशा ठेऊन असलेले तरुण कंपन्यांनी बोलवण्याची वाट पाहत असतानाच, कंपनीने या तरुणाना पत्र पाठवून धक्का दिलाय. कंपन्यांनी शेकडो जणांना पाठवलेली ऑफर लेटर्स रद्द केले आहेत. यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

( ही ही वाचा: अंतराळात शारीरिक संबंध शक्य नाही! मग अंतराळवीर गर्भधारणा करु शकतात यावर चर्चा का?)

असे कारण कंपन्यांनी दिले

आता अनेक महिने जॉइनिंग पुढे ढकलल्यानंतर ते रद्द करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की कंपन्यांनी पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत त्यांचे ऑफर लेटर नाकारले आहे. बिझनेसलाइनच्या रिपोर्टनुसार, कंपन्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये असे आढळून आले आहे की “तुम्ही आमची अकादमी पात्रता पूर्ण करत नाही, त्यामुळे तुमची निवड रद्द करण्यात आली आहे” या आयटी कंपन्यांनी ऑफर लेटर रद्द केल्याची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा आयटी उद्योग जागतिक मंदीचा सामना करत आहे.

आयटी क्षेत्रात मंदी

भारतातील जगातील आघाडीच्या बँकांनी ज्या प्रकारे व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे स्टार्टअप्ससाठी पैशांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी निधीच्या कमतरतेचा थेट परिणाम या उद्योगावर होताना दिसत आहे. व्याजदरात वाढ झाल्याने व्यवसायाच्या वातावरणावर उलट परिणाम होत आहे. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यांनीही सध्या नवीन भरती थांबवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wipro infosys tech mahindra top indian it firms rejects offer letters of hundreds of freshers gps
First published on: 03-10-2022 at 19:11 IST