करोना व्हायरसमुळे अमेरिकेत हाकार माजला आहे. ६० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर सात लाखांपेक्षा जास्त जणांना या महामारीनं ग्रासलं आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत लॉकडाउन घेतला आहे. या लॉकडाउनमध्ये घाबरलेल्या अमेरिकन नागरिकांच्या चेहऱ्यावर एका भारतीय तरूणीनं हास्य फुलवलं आहे. त्यांना धीर दिला आहे. १५ वर्षीय भारतीय वंशाच्या हीता गुप्ताची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
आजकाल पंधरा वर्षाच्या मुली कँडी क्रश खेळताना दिसतात. पण हीताने अशाच समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. हीताने नर्सिंग होममध्ये एकटं पडलेल्या वृद्ध आणि लहानग्यांसाठी अनेक भेटवस्तू आणि प्रेरणादायक पत्रे लिहली आहेत. या पत्रमुळे वृद्धांच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर नक्कीचं हास्य आलं असेल.
पेन्सिलवेनियामधील कोनेस्टोगा येथे दहावीच्या वर्गात हीता गुप्ता शिक्षण घेतेय. भारतीय वंशाची अमेरिकनं नागरिक असलेली हीता गुप्ता एनजीओ ‘ब्राइटनिंग अ डे’ चालवते. हीता अमेरिकेतील नर्गिंग होममध्ये राहणाऱ्या वृद्धामध्ये प्रेम आणि आशा निर्माण करण्याचं काम करते. हीता गुप्ता वृद्ध आणि लहानग्यांचा एकटेपणा जाण्यासाठी त्यांना प्रेरणात्मक पत्रं आणि भेटवस्तू पाठवते. भेटवस्तूमध्ये पुस्तके आणि चित्रकाढण्यासाठी साहित्या असं अनेक प्रकारच्या वस्तू पाठवते.