कोट्यधीश वृद्धाशी मॅट्रीमोनियल साईटवर एका तरुणीचे सूत जुळले आणि त्याच्याबद्दल फारशी माहिती न घेताच तिने विवाह देखील उरकून टाकला पण नंतर मात्र आपला नवरा सख्खा आजोबा निघाल्याने मात्र या जोडप्यालाच काय पण अनेकांना धक्का बसला आहे. मोट्रोमोनियल साईटवर नाती जुळतात असे आपण नेहमीच ऐकतो पण याच साईट्मुळे फार विचित्र नाते जुळले गेले आहे.
फ्लोरिडातल्या ६९ वर्षीय कोट्यधीश वृद्धाने आपल्या तिस-या लग्नासाठी स्थानिक मॅट्रीमोनियल साईट्वर आपली माहिती दिली. या साईट्वर लग्नासाठी अनेक इच्छुक तरुणींच्या प्रोफाईल होत्या. अनेक तरुणींमध्ये मात्र या वृद्धाला २४ वर्षीय एका मुलीचा फोटो खूपच भावला अन् त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. या मुलीने लग्नाला तात्काळ होकारही दिली. तीन महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न देखील झाले. मात्र नंतर फोटो अल्बम बघताना या तरुणीला यात आपल्या वडिलांचा आणि नव-याचा फोटो दिसला आणि आपला नवरा हे आपले आजोबा असल्याचे तिच्या लक्षात आले. या विचित्र लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
६९ वर्षीय वृद्धाचे याआधी दोनदा लग्न झाले होते. मात्र दोन्ही वेळी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेल्या. तिसरे लग्न केल्यानंतर हे जोडपे त्यांच्या घरी जूना अल्बम पाहत होते. तेव्हा त्यातला एक फोटो हा आपल्या वडिलांचा असल्याचे या तरुणीने ओळखले. त्यानंतर या दोघांमधील खरे नाते उघड झाले. हे सत्य कळताच तरुणीच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढले. पण तिच्या नव-याने म्हणजेच आजोबांनी मात्र तिला घटस्फोट देण्यात नकार दिला आहे.