आपल्याकडे खऱ्या प्रेमाची महती सांगण्यासाठी हिर-रांझा, लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट, मुमताज-शाहजहान या जोड्यांची उदाहरणं दिली जातात. या जोड्यांच्या प्रेमाबद्दल अनेक गोष्टी आजही प्रसिद्ध आहेत. या गोष्टी ऐकून आजही काही प्रेमीयुगुलं प्रेरणा घेतात. सध्याच्या काळात एकमेकांवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या जोड्या फार दिसत नाहीत. अनेकजण प्रेमाच्या आणाभाका तर घेतात पण, त्या पूर्ण करण्याची वेळ आली की माघार घेतात. काहीजण तर असे आहेत की, कित्येक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहूनही शेवटी एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे जोडप्यांमध्ये ‘प्रेम’ ही संकल्पना अस्तित्त्वात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, सोशल मीडियावर आता एक लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे, यामध्ये तरुणानं खरं प्रेम सिद्ध करुन दाखवलं आहे.
भैया टू सैया –
अनेक हटके लव्हस्टोरी चर्चेत येत असतात. अशातच आणखी एका लव्हस्टोरीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जी मुलगी गेल्या ८ वर्षांपासून दादा म्हणून हाक मारत होती त्याच मुलीशी या तरुणानं लग्न केलंय. त्याचं झालं असं की, या तरुणाला ही मुलगी पूर्वीपासून आवडायची मात्र नातेवाईक असल्यामुळे आणि वयातही बरंच अतंर असल्यामुळे ते शक्य नव्हतं. मात्र तरुणाचं या मुलीवर खरं प्रेम होत त्यामुळे त्यानं लग्न करणार तर हिच्याशीच असं ठरवलं होतं. अखेर ८ वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि घरच्यांची परवानगी मिळाल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. या जोडप्याला आता एक गोंडस मुलगीही आहे. हा व्हिडीओ या मुलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये भैया टू सैया असं लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – किळसवाणा प्रकार! थुंकी लावून बनवायचा तंदूर रोटी, Video सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यांच्या अनोख्या लव्ह स्टोरीवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.