जगात असे बरेच लोक आहेत जे खूप विचारपूर्वक पैसे खर्च करतात. या लोकांना अनावश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करणं बिलकुलच आवडत नाही. आपण सर्वच जण खरंतर आपल्या भविष्यासाठी, पुढील योजनांसाठी, आपल्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी पैसे वाचवत असतो. वर्तमानात मौजमजेत जगताना आपल्याला भविष्याचा विसर पडणं योग्य नाही. पैशाची बचत करणं ही १००% योग्य आणि अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहेच. पण प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतंच नाही का? आता तुम्ही कधी असं ऐकलं किंवा पाहिलं आहे का की एखादी व्यक्ती इतके पैसे वाचवते की तिला आपले कपडे धुण्यासाठी डिटर्जंट देखील विकत घेता येत नाही किंवा ती बाथरूममध्ये टॉयलेट पेपर देखील वापरत नाही? आता ही सर्व उदाहरणं वाचून अर्थात तुम्हाला धक्का बसला असेल आणि असंही वाटलं असेल की कोणीही असं काही करूच शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबाबत माहिती देणार आहोत जी इतके पैसे वाचवते की, आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसाठी सुद्धा ती पैसे खर्च करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवनावश्यक वस्तूंमध्येही काटकसर, पैसे वाचवण्याचा ‘केट’चा मार्ग

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणारी केट हाशिमोटो, एक सर्वसामान्य स्त्रीसारखी दिसते. पण तिच्याबद्दल विशेष किंवा विचित्र गोष्ट म्हणजे ती तिच्या दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी विकत घेण्यात देखील प्रचंड काटकसर करते. जीवनावश्यक वस्तू देखील खरेदी करत नाही. केटच्या मते, पैसे वाचवण्याचा हा तिचा मार्ग आहे. TLC च्या Extreme Cheapskator शो मध्ये बोलत असताना केटने स्वतःबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. केटने सांगितलं की, गेल्या ३ वर्षांपासून ती न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. जरी या शहरात राहून खूप महागडं असलं तरी तिने त्यावर अनेक मार्ग शोधले आहेत. ज्याद्वारे ती आपला खर्च नियंत्रणात ठेवते. जिथे जिथे पैसे खर्च करण्याची गरज आहे तिथे ती पैसे खर्च करणं टाळते आणि कमीत कमी गोष्टी वापरून आपला उदरनिर्वाह करते. असं करून केट एका महिन्यात फक्त $ २०० म्हणजेच १४,८०० रुपये इतकाच खर्च करते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman hates spending money doesnt buy toilet paper clothes even inner wear gst
First published on: 23-08-2021 at 13:35 IST