आजच्या धावपळीच्या जगात माणुसकी ही सुद्धा एक गोष्ट आहे हे लोक विसरले आहेत. लोकांमध्ये फक्त सगळ्यांच्या आधी आणि पुढे जाण्यासाठीची चढाओढ दिसून येत असते. मग भलेही त्यांच्या पुढे जाण्याच्या नादात एखाद्याचं नुकसान झालं तरी चालेल, अशीच मानसिकता सध्या प्रत्येकांमध्ये दिसून येते. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक अनेकदा वाटेतल्या लोकांना मदतीची याचना करताना दिसतात, पण लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक गरजूंना मदत करण्याऐवजी पुढे निघून जातात. पण त्यांच्यापैकी सुद्धा काही लोक असेही आहेत जे मदतीसाठी पुढे येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला माणुसकीचे जिवंत उदाहरण मांडताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ही एका पायाने अपंग असून ती काठीच्या साहाय्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र रस्त्याच्या मधोमध येताच लाल दिव्याचा हिरवा दिवा होऊन वाहने पुढे सरकतात. हिरवा दिवा लागताच थांबलेली सगळी वाहने पुढे सरकू लागतात आणि त्यात ही अपंग मुलगी रस्त्याच्या मधोमध अडकते. धक्कादायक गोष्ट म्हणजे सिग्नल बदलेला पाहताच या अपंग मुलीच्या बाजुनेच काही लोक तिला अडकलेलं पाहून पुढे धावत रस्ता ओलांडत असतात. अशीही काही लोक या जगात असले तरी मात्र, तेवढ्यात एक महिला धावत येते आणि अपंग मुलीला हात देऊन वाहने थांबवते. इतकंच नव्हे तर मुलीला आपल्या पाठीवर बसवून रस्ता ओलांडून देते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिलेला वाटलं किचनमध्ये चोर घुसला, पण प्रत्यक्षात जे दिसलं ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नवरा असेल तर बायकोला होतात हे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल, पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेने मुलीला कशी मदत केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होईल, हे मात्र नक्की. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील दिलीय. ‘हे जग ‘अद्भुत माणसांनी भरले आहे’. अवघ्या ३९ सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १० हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईकही केलं आहे.

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘म्हणूनच जपानची गणना जगातील सर्वोत्कृष्ट देशांमध्ये केली जाते’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘या जगात चांगले लोक आहेत, त्यामुळेच हे जग चालत आहे’.