Strange Accident Captured In Bus Camera : असे म्हणतात की डोळे फसवू शकतात पण कॅमेरा फसवू शकत नाही. अनेकदा कॅमेरामध्ये अशी काही दृश्य कैद होतात, जी पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या अशाच एका थरारक अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फुटेज व्हिडीओ चालत्या बसच्या आतील आहे, ज्यामध्ये बसलेली एक महिला विचित्र अपघाताची बळी ठरताना दिसतेय. तुर्कीतील गेब्जेमधील ही घटना आहे.

व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये काही लोक सिटी बसमधून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. पुढच्याच क्षणी ड्रायव्हरने बसचा वेग वाढवताच एक महिला काय विचार करत सीटवरून उठते ठावूक नाही, पण पुढे ती चालत्या बसमधून खाली उतरते. हे पाहून इतर प्रवासी चक्रावले. त्या महिलेने असे का केले या विचारात ते पडले, यावेळी चालकाने लगेच गाडी थांबवली, पण तोपर्यंत महिला बसच्या मागील चाकाखाली आली होती. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रवासी आणि ड्रायव्हर दोघेही या महिलेने असे का केले अशा विचारात भराभर बसमधून खाली उतरले आणि महिलेच्या दिशेने धावत सुटले.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral
निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Accident Shocking Video
पाठीमागून मृत्यू आला अन्…अचानक रस्त्यावर थरारक अपघात; पण चूक कुणाची? VIDEO पाहून चक्रावून जाल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

अपघाताचा हा थरारक व्हिडीओ @Morbidful या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत जवळपास दोन कोटी वेळा पाहिला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बस पूर्ण थांबण्यापूर्वी महिलेने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि गाडीच्या मागील चाकाखाली अडकली. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. आता या विचित्र अपघाताचा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बसमध्ये बसलेली एक महिला अचानक सीटवरून उठते. यानंतर ती भरधाव वेगात असलेली बस थांबण्याच्या आतच बसमधून उतरते, पण तोल जाऊन ती रोडवर कोसळते आणि बसच्या मागच्या चाकाखाली येते. दोन सेकंद प्रवाशांनाही समजत नाही नेमकं काय घडले. पण, बसचालक बस थांबवतात व सर्व प्रवासी धावत बसमधून उतरतात आणि त्या महिलेच्या दिशेने धावतात.

एका युजरने कमेंट केली आहे की, एवढी वृद्ध असूनही एका महिलेने लहान मुलांसारखी चूक कशी केली. त्याच वेळी, दुसरा वापरकर्ता म्हणतो की, येथे बसचालकाचीही चूक आहे. स्टॉप येण्यापूर्वी त्याने दरवाजा कसा उघडला? आणखी एका युजरने कमेंट केली आहे, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.