Viral video: आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय राहणे जवळजवळ अशक्य झाले आहे. स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आजच्या काळात तुम्हाला खूप कमी लोक सापडतील ज्यांच्या हातात स्मार्टफोन नाही. आता ही लोकांची गरज बनली आहे आणि काही लोकांसाठी ही फॅशन सुद्धा आहे. फोनचं प्रचंड वेड असणं, व्यसन लागणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहून कळेल. आपल्या व्यक्तित्वाचा अविभाज्य अंग बनलेल्या मोबाईलच्या व्यसनापायी कशातच लक्ष राहत नसल्याची तक्रार होत असते. याचेच एक उदाहरण म्हणून सध्या एक व्हिडीयो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच डोक्याला हात लावाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जोडपं त्यांच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर आलं आहे. तिथे त्यांच्या गाडीसमोर आधीच एक गाडी पेट्रोल भरण्यासाठी उभी आहे. यामुळे महिला गाडीवरुन उतरून पुढे जाऊन उभी राहाते. म्हणजे तिचा बॉयफ्रेंड तरुण पेट्रोल भरून पुढे आला की तिला त्याच्या गाडीवर बसून जाता येईल. मात्र मोबाईलमध्ये व्यस्थ असलेली तरुणी बॉयफ्रेंड साडून चक्क एका अनोळखी व्यक्तीच्या मागे बसली. मोबाईलमध्ये व्यस्थ व्यक्तीला मोबाईलमुळे एवढंही भान नाही की आपण अनोळखी व्यक्तीच्या मागे बसलो आहोत. हे सगळं पाहून तिचा प्रियकर चकित झाला. त्याने लगेच येऊन महिलेच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला अनोळखी व्यक्तीसोबत जाण्यापासून रोखलं. यानंतर महिलेला आपली चूक लक्षात आली आणि ती लगेच मोटारसायकलवरून उतरली.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेवटी बापाचं काळीज! पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी हत्तीनं  गुडघ्यावर बसून मागतली मदत; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तसाच हा व्हिडीओसुद्धा. हा व्हिडीओ medialahmy या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.