सोशल मीडियावर सध्या जिकडे तिकडे ‘मनिके मागे हिते’ गाण्याचा बोलबोला पहायला मिळतोय. श्रीलंकन गायिका योहानी दिलोका डी सिल्वाने गायलेल्या या गाण्याने आज सामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा वेड लावलंय. योहानीच्या गोड आवाजाने सर्वांचं मन तर जिंकलंच आहे. या गाण्याचे काही भाषांमध्ये व्हर्जनही आले आहेत. अशात आता एका महिलेच्या बेली डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिलेचे डान्स मुव्ह्स पाहून नेटिझन्स खूपच खूश झाले आहेत. हा बेली डान्स पाहून ‘शकिराही फेल’ असं नक्की म्हणाल.

मनिके मागे हिते गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. या गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. मात्र आता या गाण्याला आणखी बेली डान्सचा तडका देत महिलेने सोशल मीडियावरील धुमाकूळ माजवलाय. या व्हिडीओनेही सर्वांनाच थक्क करून सोडलंय. या व्हिडीओमधील महिलेचा बेली डान्स पाहून पाहणारे केवळ पाहतच राहीले आहेत. यात या महिलेने इतका सुंदर बेली डान्स केलाय की तिच्यासमोर प्रसिद्ध बेली डान्सर शकिराही फेल ठरली आहे.

सोशल मीडियावर या बेली डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमधील महिलेचे नाव रक्षा पर्सनानी असं आहे. ही महिला एक माजी आयटी प्रोफेशनल असून बेली डान्सर बनली आहे. तिला बेली डान्सची आवड असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच बेली डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. त्यातला हा एक बेली डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

रक्षा पर्सनानी हिने हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिलीय. “मी या गाण्यावर गुणगुणणे थांबवू शकत नाही आणि त्यावर नाचणंही थांबवू शकत नाही!” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तिच्या डान्स कौशल्य पाहून नेटिझन्स सुद्धा व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Raksha Parsnani (@raksha.parsnani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मनिके मागे हिते’ हे गाणं तसंही आपल्याला नीटपणे गाता येणार नाही. निदान या गाण्यावर बेली डान्सने ठुमेक लावत हे गाणं एन्जॉय करता येऊ शकतं. मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं. सिंहली भाषेतलं. मूळ सिंहली भाषेतलं गाणं 2020 मध्ये रीलिज झालं होतं. ते श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे 2021 मध्ये पुन्हा गायलं. अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं आणि अर्थातच इथून जगभर. योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायलं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू, मराठी, काश्मिरी आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.