नादच खुळा! अशी डॅशिंग सुपरबाईक तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नसेल, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमधली सुपरबाईक सध्या प्रचंड चर्चेत आलीय. हा सुपरबाईक पाहण्यासाठी रस्त्यावरील लोकांनी तर अक्षरशः गर्दी केली. तुम्ही सुद्धा अशी सुपरबाईक यापूर्वी कधी पाहिली नसेल.

Superbike-Video-Viral
(Photo: Instagram/ bikewithgirl)

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारे असतात, तर काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. मुलींना ड्रायव्हिंग करताना पाहिल्यानंतर “बघ रे, ते विमान लँड होणार आता… ती उजवा सिग्नल दाखवतेय; पण वळणार नक्की डावीकडेच… वळताना स्पीड कमी करायचा असतो, कधी कळायचं पोरींना.. ” अशा कमेंट्स सतत येतच असतात. मुलींचे ड्रायव्हिंग हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो एका मुलीच्या सुपरबाईकच्या रायडिंगमुळे…या व्हायरल व्हिडीओमधली सुपरबाईक सध्या प्रचंड चर्चेत आलीय. हा सुपरबाईक पाहण्यासाठी रस्त्यावरील लोकांनी तर अक्षरशः गर्दी केली. तुम्ही सुद्धा अशी सुपरबाईक यापूर्वी कधी पाहिली नसेल.

काही लोकांना वेगवेगळ्या मॉडिफाईड बाईकचं इतकं वेड असतं की त्यांना बाईकवर वेगवेगळे प्रयोग करण्याचं वेड असतं. सध्या अशीच एक सुपरबाईक सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचं आणि सोबतच रस्त्यावरील प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहे. एक भन्नाट सुपरबाईक रस्त्यावर धावताना पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. प्रियंका कोचर नावाची ही एक महिला रस्त्यावर ही सुपरबाईक चालवताना दिसली. ही मुलगी ‘बाईक विथ गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिचे इन्स्टाग्रामवर एक मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आणखी वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात चमत्कार! शंकराच्या पिंडीवर जमा झाला बर्फ, पाहा VIRAL VIDEO

डिजिटल कंटेंट क्रिएटर असलेली प्रियंका हिचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं असता त्यावर बाईकसोबतच्या तिच्या वेगवेगळ्या व्हिडीओंचा जणू खजिनाच दिसून येतो. सध्या एका सुपरबाईकची रायडिंग करतानाचा तिला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. पिवळ्या रंगाच्या या सुपरबाईकमध्ये तिने चक्क आवडती रोपे ठेवण्यासाठी जागा देखील बनवली आहे. या सुपरबाईकचं डिझाईन पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. या सुपरबाईकच्या चारही बाजुंना सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे देखील बनवण्यात आले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भरधाव वेगात कार जात होती अन् रुग्णवाहिकेच्या समोरून घसरली, डिव्हायडरला धडकली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावरून उडी मारली, VIRAL VIDEO पाहून चक्रावून जाल

या व्हायरल व्हिडीओमधली सुपरबाईक ही कॅनडाची मोटारसायकल आहे. Can-Am कंपनीने ही सुपरबाईक बनवली आहे. स्पायडर आरटी लिमिटेड नावाची ही बाईक सोशल मीडियावर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. त्याची लांबी २६६७ मिमी, रुंदी १५७२ मिमी, उंची १५१० मिमी, ग्राउंड क्लिअरन्स ११५ मिमी आणि व्हीलबेस १७१५ मिमी आहे. या वाहनाची सीट ७७२ मिमी उंच आहे. बाईकर्सच्या मनोरंजनासाठी यामध्ये ऑडिओ सिस्टीमही बसवण्यात आली आहे.

आणखी वाचा : ‘सुपरफास्ट’ तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा VIDEO VIRAL

या सुपरबाईकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये बाईकबद्दल माहिती विचारताना दिसून येत आहेत. या बाईकची किंमत किती असेल, असं विचारत प्रियंका कोचर हिने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ९२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. अशी सुपरबाईक पाहून तुम्ही सुद्धा हैराण झाले असाल, हे नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman rides a superbike on road viral video bags 6 million views prp

Next Story
Viral : Zomato ने ट्विटरवर विचारला ‘हा’ प्रश्न’; नेटकऱ्यांची भन्नाट उत्तरं पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी