VIRAL VIDEO : घोडा आणि कुत्र्यासोबत महिलेने सुरू केली स्केटिंग स्पर्धा, पाहा कोण जिंकतं?

घोडा आणि कुत्र्यासोबत माणसाने स्केटिंगची स्पर्धा लावली तर कोण जिंकेल? तुम्ही म्हणाल घोडा, मग तुमचं उत्तर चुकलंय. पाहा हा VIRAL VIDEO

VIRAL VIDEO : घोडा आणि कुत्र्यासोबत महिलेने सुरू केली स्केटिंग स्पर्धा, पाहा कोण जिंकतं?
(Photo: Twitter/ buitengebieden )

जर तुम्हाला कोणी विचारलं की घोडा आणि कुत्र्यासोबत माणसाने स्केटिंगची स्पर्धा लावली तर कोण जिंकेल? तर हा प्रश्न वाचून कदाचित तुम्हाला हसू येईल आणि तुमचं उत्तर असेल घोडा जिंकणार. कारण धावण्याच्या शर्यतीत माणूस घोड्याशी कुठे स्पर्धा करू शकणार, बरोबर ना?; पण तुमचं उत्तर चुकलंय असं आम्ही म्हटल्यास तुमचा विश्वास बसेल का? तुमचं उत्तर खरंच चुकलंय. कारण एका महिलेने स्केटिंगच्या स्पर्धेत घोड्यालाही हरवलंय. ही महिला सध्या तिच्या या अशक्यप्राय कामगिरीमुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक महिला स्केटिंग करताना दिसत आहे. अतिशय वेगाने ही महिला स्केटिंग करताना दिसतेय. तिच्या उजव्या बाजूला एक घोडा देखील तिच्यासोबत धावताना दिसत आहे. महिलेसमोर एक कुत्राही धावत आहे. मग हळुहळु या व्हिडीओचे रुपांतर शर्यतीत होतं. या शर्यतीत घोड्यालाही मागे टाकणारी महिलेची स्केटिंग पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL

हा व्हिडीओ “Buitengebieden” नावाच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. घोडा आणि कुत्र्यासोबतची ही स्केटिंग स्पर्धा रंगलेला हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ७.३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ३ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण
फोटो गॅलरी