लहानपण देगा देवा’ हे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. आपण मोठं झालो की, आपल्याला लहानपणीचे किंवा शाळेतील ते दिवस आठवतात, जे खूपच मजेशीर असतात. लहानपणी ना उद्याची काळजी सतावते, ना करिअर आणि पैशांचं ओझ असतं. ज्यामुळे लहानपणीचं आयुष्य हे खूप चांगलं असं आपल्याला वाटतं. तुमच्या आमच्यासारखे अनेक जण लहानपणी जेव्हा आपल्याला शाळेत पाठवलं जायचं त्यावेळी शाळेच्या गेटवर अगदी जमिनीवर लोळून ढसाढसा रडले असाल. त्यावेळी आपल्याला सुद्धा शाळेत जायचा कंटाळा यायचा. नेमका अशाच एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शाळेत जाण्यासाठी नकार देणाऱ्या मुलाला त्याच्या आईने चक्क हात-पायांना धरून त्याला जबरदस्ती शाळेत आणलंय. याचा व्हिडीओ सध्या लोक खूपच एन्जॉय करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या शालेय जीवनातील बालपणाची आठवण आली आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ भलताच मजेशीर असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ एका शाळेत जाणाऱ्या मुलाचा आहे. हा चिमुकला शाळेत जाण्यासाठी नकार देत होता. शेवटी त्याच्या आईने त्याचे हात पाय बांधून त्याला शाळेत आणलं. हा मजेदार किस्सा पाहून शाळेत आलेले इतर विद्यार्थी सुद्धा आईला मदत करण्यासाठी पुढे येतात आणि या मुलाचे हात-पाय पकडून त्याला शाळेत आणतात. यावेळी मुलगा जोरजोरात ओरडताना दिसून येतोय. ‘मला शाळेत नाही जायचंय’ असं तो किंचाळून सांगताना दिसून येतोय. पण आई या मुलाचं काहीही एक ऐकत नाही आणि त्याला शाळेत आणूनच मोकळा श्वास घेते.

आणखी वाचा : एकट्या जिराफाची शिकार करायला आले तब्बल ६ सिंह, लढाईत कोण जिंकलं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गॅसवर चपाती भाजायची शिकत होती ही मुलगी, पण पुढे तिने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही

हा २० सेकंदाचा व्हिडीओ IFS डॉक्टर सम्राट गौडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘तुम्हाला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून तुमचे आई-वडील आणि मित्रांने केलेले परिश्रम कधी विसरू नका’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो पाहिल्यानंतर पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर कऱण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रीट्वीट केलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman tied sons hands feet and take him to school in viral video netizens remembered school days prp
First published on: 29-04-2022 at 16:58 IST