Funny Video Viral : सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ फार भयानक, डोळ्यातून पाणी आणणारे असतात; तर काही फार गमतीशीर असतात, जे पाहून हसू आवरणं अनेकदा अवघड जातं. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी रस्त्याने जात असताना तिची चप्पल डांबरात चिकटते. तिच्या मदतीसाठी एक लहान मुलगा येतो. पण, त्याच्याबरोबरही अशी काही गंमत होते की, पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

हा मजेशीर व्हिडीओ नेपाळमधील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे एका रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होते. पण, हे पाहूनदेखील लोक त्याच रस्त्यावरून चालत होते. यावेळी एक तरुणी त्या रस्त्यावरून चालत असताना तिची चप्पल डांबरात चिकटते आणि नंतर पुढे असे काही घडते की पाहून हसू आवरणं अवघड होईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हिडीओत दिसतेय की, एक तरुणी नुकतेच डांबर टाकलेल्या रस्त्यावरून चालत दुकानात जात होती. पण, तिच्या पायातील चप्पल अचानक त्या गरम डांबरामुळे रस्त्यावर चिकटून राहते. ती खूप प्रयत्न करते, पण चप्पल काही केल्या निघत नाही, अखेर ती चप्पल तशीच ठेवून बिना चप्पल रस्त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. यावेळी तरुणीच्या मदतीसाठी एक लहान मुलगा पुढे येतो.

अवघा सात-आठ वर्षांचा तो मुलगा काही न बोलता त्या रस्त्यावरून तरुणीची अडकलेली एक चप्पल काढून देतो, पण दुसरी चप्पल डांबरावर इतकी घट्ट चिकटलेली असते की, ती ओढून काढताना त्याच्या पायातील चप्पल डांबरात अकडून राहते. तरुणीच्या दोन्ही पायातील चपला तो काढून देतो खरा, पण शेवटी त्याच्या पायातील चप्पलही त्या डांबरात अडकून बसते, यानंतर तो आपल्या चपला काढण्याचा प्रयत्न करतो पण खाली कोसळतो. अखेर एक माणूस त्याच्या चपला ओढून काढतो. डांबरात चपला अडकण्याचा सुरू असलेला हा खेळ पाहून उपस्थित लोकही हसू लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडीओ official_abhinav नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही भन्नाट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, बिचाऱ्याबरोबर खूप वाईट झालं”, दुसऱ्याने लिहिले की, ”आता परत कोणाची मदत करणार नाही.”