गावासारख्या ठिकाणी मोटरसायकलवरून फिरण्याची एक वेगळीच मजा असते. यात जर मोटरसायकलच्या पाठीमागे कोणी बसले असेल तर प्रवास आणखी मजेशीर होतो. अशाच प्रकारे मोटरसायकलवरून प्रवासाचा अगदी मनमुराद आनंद लुटणाऱ्या दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दोन महिला अगदी आरामात मोटरसायकलवरून जात असताना कोणीतरी त्यांचा व्हिडीओ काढत असल्याचे त्यांच्या लक्षात येते. या वेळी व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीच्या कॅमेराकडे पाहून दोघी एक स्मित हास्य देत फ्लाइंग किस देतात. दोन महिलांचा हा मोटरसायकलवरील आनंदी प्रवास अनेक यूजर्सना फार आवडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर शाबीर झायेद या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोन महिला मोटरसायकलवरून प्रवासाचा आनंद घेत असताना दिसत आहेत. आजूबाजूला हिरवळ आणि त्यामधील मोकळ्या डांबरी रस्त्यावरून त्या महिला मोटरसायकल घेऊन अगदी सुसाट निघाल्या आहेत. यात साडी नेसलेली एक वृद्ध महिला मोटरसायकल चालवत आहे.

महिलेने अवघ्या काही सेकंदांत तयार केला रस्त्यावर पूल; तिची कला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘व्वा क्या बात हैं!’

एक व्यक्तीने दोघींचा हा आनंदी प्रवास आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड केला आहे. या व्यक्तीच्या कॅमेराकडे पाहून दोघी हसून बाय बाय करतात, यानंतर फ्लाइंग किस देतात. मोटरसायकल चालवणारी महिलाही कॅमेराकडे पाहून हात वर करत बाय बाय करताना दिसतेय. हेल्मेटशिवाय त्या आनंदाने मोटरसायकलने वेगाने जाताना दिसतात. या व्हिडीओतून १९८९ चा मल्याळम चित्रपट ‘नादुवाझिकल’मधील अपबीट गाणे रविल पुंथेनमधील एक जिवंतपणा जाणवतो.

व्हिडीओ पाहा :

व्हिडीओ शेअर करणारे यूजर्स झायेद, यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये म्हटले आहे की, ते एक चित्रपटनिर्माता आणि छायाचित्रकार आहे. त्यांनी मल्याळम भाषेत व्हिडीओला कॅप्शन दिली आहे. #motorcyclediaries #lifeofwomen #loveislove. हा व्हिडीओ तामिळनाडूमध्ये शूट केलेला आहे. तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील स्त्रिया मोटरसायकल आणि सायकल चालवताना दिसतात.

हा व्हिडीओ २५ एप्रिल रोजी शेअर केला असून जो आता सोशल मीडियावर एक मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. जो पाहून यूजर्सनाही आनंद होत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले ही, ‘वय फक्त एक संख्या आहे’. आणखी एका यूजरने लिहिले, ‘आदिपोली गाणे’. तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘लेव्हल लेव्हल’. सोशल मीडियावर लोकांना आनंद देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे यूजर्सनाही खूप आवडतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women enjoying motorcycle ride giving flying kisses video goes viral sjr
First published on: 21-05-2023 at 12:01 IST