सूर्याच्या कोवळ्या उन्हाने भलेभले आजार बरे होतात असं म्हणतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच सकाळी उन्हाने शेकवून घेण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यकिरणांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन डी मुळे डोळ्यांच्या समस्या, त्वचेचे विकार दूर होतात. मात्र हे सर्व कोवळ्या उन्हात म्हणजे सूर्योदयानांतर केवळ एक दोन तासात फायद्याचे ठरते, जर दुपारी भर उन्हात तुम्ही असे काही प्रयोग करायला गेलात तर चांगलेच अंगाशी येऊ शकते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या भुवया उंचावत आहे. समुद्रकिनारी उन्हात बसल्याने चक्क एका महिलेचे कपाळ वितळल्याची घटना समोर येत आहे. काय आहे हा एकूण प्रकार जाणून घेऊयात..

बल्गेरिया मध्ये स्थित एक महिलेच्या बाबत ही घटना घडली आहे. सिरीन मुराद असे या महिलेचे नाव असून त्या व्यवसायाने एक ब्युटिशियन आहे. सिरीन आपल्या सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनारी आनंद घेण्यासाठी पोहचल्या होत्या. अनेक पाश्चिमात्य देशात सूर्यकिरणांमध्ये काही वेळ बसून एक टॅनिंग थेरपी घेण्याची पद्धतच आहे, त्यानुसार सिरीन सुद्धा छान उन्हाचा आनंद घेत होत्या. यावेळी त्यांनी सनस्क्रीन किंवा कोणतेही अँटी- हिट लोशन लावलेले नव्हते.

डबल चीन वर उपाय शोधायला गेली अन.. पाल होऊन आली! या महिलेच्या बाबत घडलं असं काही की…

२१ डिग्री सेल्सियस उन्हात जवळपास अर्धा तास उन्हात झोपल्यावर जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांना कपाळावर जळजळ जाणवू लागली. जेव्हा त्यांनी आरसा पहिला तेव्हा त्यांचे कपाळ लाल झाले होते. तेव्हा त्यांनी उन्हामुळे त्रास होत असेल असं समजून फार लक्ष दिलं नाही पण काही वेळाने त्यांना वेदना जाणवू लागल्या. रिपोर्टनुसार, जेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी पाहिलं तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरुकुत्या दिसू लागल्या. त्यांचे कपाळ वितळलेल्या प्लॅटिकसारखे कडक व सुरकुतलेले दिसत होते. सिरीन मुराद यांनी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला त्रास सांगत फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, सिरीन यांनी सध्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उपचार सुरु केले आहेत. अनेक त्वचा तज्ज्ञ वारंवार हा सल्ला देत असतात की केवळ उन्हाळ्यातच नाही तर आपणही जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा.