Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ‘खतरो के खिलाडी’ या हिन्दी रिअॅलिटी शोची आठवण येईल. व्हिडीओत दोन महिला डोंगरावरील भयानक रस्त्यावरून बाइक चालवताना दिसत आहे. महिलांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
तु्म्ही सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण अनेकदा काही लोकांना खऱ्या आयुष्यात दररोज स्टंट करावे लागतात. सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन महिलांना सामानांची ने-आण करण्यासाठी डोंगरावरील खडतर रस्त्यावरून बाइक चालवावी लागत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक महिला दिसेल जी डोंगरावरील खडतर रस्त्यावरून बाइक चालवत आहे. बाइक चालवताना तिने घेतलेले प्रत्येक टर्न धडकी भरवणारे वाटेल. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. ही महिला गाडीवर सामान घेऊन डोंगर उतरताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत आणखी एक महिला दिसते ती बाइक घेऊन डोंगरावर चढताना दिसते. या दोन्ही महिला त्यांच्या बाइकसह आमने-सामने येतात पण नंतर एकमेकांना क्रॉस करून पुढे जातात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai road accident 2 girls injured after being hit by speeding car shocking video
मुंबईत रस्ता ओलांडताना भीषण अपघात; चूक कुणाची? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
A groom dance on haripath not on dj in haldi program
संस्कृती जपणारी माणसं! डिजे नव्हे तर हरिपाठावर धरला ठेका, हरिपाठावर नाचणाऱ्या नवरदेवाचा VIDEO VIRAL
stray dogs at least five dog attack on kid cctv footage video viral on social media
VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

हेही वाचा : मुलीचे कपडे घालून गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला मुलगा अन् रंगेहाथ पकडला; पुढे काय झाले, पाहा VIDEO

earthtell या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही या डोंगरावर बाइक चालवण्याची हिम्मत कराल का?” हा व्हिडीओ पाच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला असून यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मी का घाबरत आहे?” तर एका युजरने लिहिलेय, “खरे खतरो के खिलाडी या महिला आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोंगरावर राहणाऱ्या महिला खूप मेहनती असतात.”