Viral video: आज काल चोरीच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गाड्या चोरी करताना, कधी दागिणे, तर कधी पर्स. चोरी करण्याच्या विविध स्टाइल्स तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरीच्या अनेक घटना पाहून आपल्याला हसायला येते. आज एका अशा चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात महिलेनं चक्क साड्यांचा बंडलंच चोरला आहे. या चोरलेल्या साड्या तिनं कुठे लपवून ठेवले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. चोर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरुन चोरीच्या संधी शोधून काढतात. अनेकदा चोर चोरी करण्यासाठी योजना आखतो आणि मग ते सामान लपवण्यासाठी अनोखीच स्टाईल शोधून काढतो. पण, या महिलेनं स्वतःच्या साडीचा वापर साड्या लपवण्यासाठी केला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता साड्यांच्या दुकानात काही महिला आल्या आहेत. या सगळ्या महिला एकमेकींना ओळखत असून त्या गृपनेच आल्या आहेत. या सगळ्याजणी चोरी करण्याच्या उद्देशानं आल्या असून त्या आजूबाजूची परिस्थिती पाहून एका महिलेला चोरी करण्यासाठी मदत करत आहेत. यावेळी जशी संधी मिळते तशी ही महिला साड्यांचा बंडल आपल्या साडीमध्ये लपवते. यावेळी बाकीच्या महिलांनी कुणालाही दिसू नये म्हणून तिच्या भोवती गोल केला आहे. या महिलांना वाटत होतं की आपली चोरी पकडली जाणार नाही. आपल्याला कुणीही बघत नाही, मात्र ही सर्व चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय सांगता! विजेचा वापर न करता शाळकरी मुलानं बनवली वॉशिंग मशीन; जुगाड VIDEO पाहून सर्वच झाले थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @videonation.teb या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.