नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. नारळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे त्यामुळेच भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये नारळाचा किंवा त्याच्या खोबऱ्याचा भरपूर प्रमाणात वापर होतो. कधी भाज्यांसाठी वाटणामध्ये, कधी खोबऱ्याच्या चटणीसाठी…अशा अनेक गोष्टींमध्ये खोबरं सर्रास वापरले जाते.

आजकाल व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्याला कमी वेळात अनेक गोष्टी करायच्या असतात. अशावेळी स्वयंपाक करताना ओलं खोबरं हवे असेल तर त्यासाठी फार वेळ जातो. कारण नारळ सोलून त्याला खवून किंवा त्याला फोडून, आपटून तुकडे करुन चाकूने त्याचे खोबरे काढणे म्हणजे फार वेळखावू काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नारळातील खोबरं झटपट बाहेर काढण्याची सोपी ट्रिक सांगणार आहोत. नारळ फोडण्याची ही सोपी पद्धत वापरून तुम्हाला फार कष्ट न घेता नारळातील खोबरं सहज बाहेर काढता येईल. चला तर मग जाणून घेऊ या.

हेही वाचा – पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना हार घालून श्रद्धांजली वाहतेय ‘ही’ व्यक्ती? पाहा व्हायरल व्हिडीओ

नारळ फोडण्याची सोपी पद्धत

१. नारळाच्या शेंड्या काढून सोलून घ्या.
२ . नारळाच्या तीन डोळ्यांमधून (शेंडी काढल्यानंतर दिसणारे तीन काळे डाग) त्यातले पाणी बाहेर काढून घ्या.
३. नारळाला गोलाकार फिरवत एका जड वस्तूने मारावे.
४. त्यानंतर गॅसवर जाळी ठेवून मध्यम आचेवर सर्व बाजूने नारळ भाजून घ्या. २-३ मिनिटांत नारळ भाजून होईल.
५. नारळ व्यवस्थित गरम झाला की त्याला तडे जाऊ लागतात.
६. तडे जाऊ लागले गॅस बंद करून नारळ थंड होऊ द्या.
७. नारळ खूप गरम करू नये अन्यथा त्यातील तेल बाहेर येते.
८. नारळ थंड झाला की अलगदपणे नारळाच्या आवरणातून खोबरे बाहेर काढता येते.
९. तुम्ही ते खोबरे तसेच वापरू शकता किंवा साल काढण्याच्या यंत्राने काळा भाग काढून पांढरे शुभ्र खोबरे वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही या पद्धतीने नारळ फोडून पाहा. तुमचा वेळही वाचले आणि झटपट खोबरं देखील मिळेल.