दरवर्षी १ नोव्हेंबर हा जगभरात वर्ल्ड विगन डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांना शाकाहारी जीवन जगावे या उद्देशाने हा दिवस साजरा होतो. यात वन्यप्राणी, पक्षांना कोणताही हानी न पोहचवता आपले जीवन जगण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती म्हणजे व्हिगन. गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी जेवण अनेकांच्या आवडीचा भाग बनत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांपासून खेळाडूंपर्यंत पूर्णपणे शाकाहारी आहाराची निवड करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच अनेक संशोधनांतून शाकाहारी आहारामुळे अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येत असल्याचे सिद्ध झाल्याने शाकाहारी जेवण निवडण्याचा ट्रेंड वाढतोय. त्यामुळे दरवर्षी शाकाहारी जेवणाचे महत्व पटवून देण्यासाठी जगभरात १ नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड  विगन डे म्हणून साजरा होतो.

‘वर्ल्ड  विगन डे’चा इतिहास

‘द व्हेजिटेरियन सोसायटी यूके’चे सदस्य डोनाल्ड वॉटसन व एलिस श्रीगले यांनी १९४४ मध्ये क्लबबरोबर मिळून आहारातून मांसाहार काढून टाकण्यासह प्राण्यांपासून बनवलेली उत्पादने आणि पदार्थ टाळण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेकांनी त्यावेळी या गोष्टीस विरोध केला. त्यामुळे या दोघांनी ‘द व्हेगन सोसायटी’ स्थापन केली.

त्यानंतर १९९४ मध्ये ‘द व्हेगन सोसायटी’च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त यूके सेलिब्रिटी आणि व्हेगन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष लुईस वॉलिस यांनी १ नोव्हेंबर हा ‘वर्ल्ड  विगन डे’ म्हणून घोषित केला. या दिवसाच्या बाबतीत तारखेचा निर्णय घेताना, १९४४ मध्ये व्हेगन सोसायटीची निर्मिती झाली हे सर्वांना माहीत होते; मात्र ती कोणत्या तारखेला झाली हे माहीत नव्हते. त्यामुळे हॅलोविन आणि डेड ऑफ द डेचे निमित्त साधत वॉलिस यांनी १ नोव्हेंबर ही तारीख निवडली.

व्हेगन सोसायटीच्या अध्यक्षांनी दरवर्षी ‘वर्ल्ड  विगन डे’ स्मरणीय बनवण्यासाठी आणि लोकांमध्ये शाकाहारी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिनाचे महत्व पटवून देत असताना शाकाहारी जेवणात कोणतेही प्राणीजन्य अन्नपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात दूध, अंडी, मध, तूप हे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जातात.

‘वर्ल्ड  विगन डे’ साजरा करण्यामागचा उद्देश

हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरण वाचवण्यासाठी आणि लोकांना शाकाहारी आहार निवडण्यास प्रोत्साहन देणे. कारण- शाकाहारी अन्न खाल्ल्याने तुम्ही स्वत:ला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता. त्यातून तुम्ही एक प्रकारे पर्यावरणाचे आणि त्यातील पशू-पक्ष्यांचेही रक्षण करता, असा अर्थ होतो. तर, मांसाहारामुळे अनेक आजार होऊ शकतात; पण कर्करोगासारखे गंभीर आजार शाहाकारी जीवनशैलीने बरे होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वर्ल्ड  विगन डे’चे महत्त्व

या दिवशी लोकांना शाकाहारी आहाराचे फायदे, तसेच पर्यावरणासाठी शाश्वत दृष्टिकोन कसा आहे याची जाणीव करून दिली जाते. एक सुनियोजित शाकाहारी आहार जीवनाच्या सर्व टप्प्यांवर फायदेशीर असल्याचे पटवून देता येते.