Brain Teaser : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून अनेक लोक चक्रावून जातात. पण आता सुडोकूचा एक फोटो व्हायरल झाल्याने या लोकांच्या बुद्धीला आणखी कस लागणार आहे. अशाप्रकारच्या टेस्ट बुद्धीला चालना देतातच पण आपल्याकडे विचार करण्याची क्षमता किती आहे, याचीही तपासणी करतात. तुम्ही जर अशा आव्हानात्मक टेस्टच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ब्रेन टिझरचा जबरदस्त फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दिलेलं गणित विषयाचं एक पझल तुम्हाला अचूकपणे सोडवायचं आहे. ज्या व्यक्तीचं रिझनिंग स्किल चांगलं आहे, तीच माणसं या टेस्टचं अचूक उत्तर सांगू शकतात. ही परीक्षा द्यायला आता तुम्ही तयार आहात का? तुमची वेळ सुरु झालीय.

हा ब्रेन टिझरचा फोटो @maths_Puzzle या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत एक चौकोनी जाळी दिसत आहे आणि तुम्हाला यामध्ये मिस झालेला नंबर रिझनिंग कौशल्य वापरून शोधायचा आहे. दोन दिवसांपूर्वी पझलचा हा फोटो ट्वीटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत २७ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी दोन प्रकारची उत्तर बरोबर असल्याची शक्यता वर्तवली आहे. काहींनी २४ आणि १८ असं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे.

नक्की वाचा – Video: ‘या’ तरुणीचा नादच खुळा! ‘थ्री टायर प्लॅंक’ करुन बनवली बॉडी, भल्या भल्यांना जमणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारे लोकांनी सांगितलं उत्तर

एका ट्वीटर यूजरने उत्तर देत सांगितलं, “ab – (a + b) ४ x ८ – (४ + ८) = ३२ – १२ = २० ९ x ३ – (९ + ३) = २७ – १२ = १५ ६ x ६ – (६ + ६) = ३६ – १२ = २४ or a + २b ४+ २ x ८ = ४ + १६ =२० ९ + २ x ३ = ९ + ६ =१५ ६ + २ x ६ = ६ +१२ = १८.” तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, “६*६=३६, ३६-(६+६)=२४.